अमिताभ बच्चन यांची नात ‘या’ अभिनेत्याला करतेय डेट ? दोघांचा व्हिडीओ व्हायरल झाल्याने चर्चांना उधाण

मुंबई – अमिताभ बच्चन यांची नात नव्या नवेली नंदा आणि अभिनेता सिद्धांत चतुर्वेदी हे दोघे एकमेकांना डेट करत असल्याच्या बातम्यां अनेक दिवसांपासून समोर येत होत्या. अशात दोघेही विमानतळावर स्पॉट झाल्याने आता पुन्हा एकदा दोघेही एकमेकांना डेट करत असल्याच्या चर्चा सोशल मीडियावर सुरु झाल्या आहेत.
सिद्धांत आणि नव्या विमानतळावरून सोबत बाहेर येताना दिसले. दोघेही गोव्यावरून आपले व्हेकेशन संपवून आल्याचं बोललं जात आहे. यावेळेसचा दोघांचा एक व्हिडीओ देखील समोर आला आहे. जो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय.
पापाराजीने दोघांचा व्हिडीओ शेअर करत “गोव्याहून आल्यावर सिद्धांत चतुर्वेदी आणि नव्या नंदा यांचा एकत्र पहिला क्लिक” असे कॅप्शन देखील दिले आहे. व्हिडिओमध्ये विमानतळावरून येताच दोघेही एकमेकांसोबत जाताना दिसले. विशेष म्हणजे यावेळी दोघांनी परफेक्ट कपलप्रमाणे मॅचिंग व्हाईट शर्ट परिधान केले होते.
View this post on Instagram
यापूर्वी नव्या सिद्धांतच्या पालकांसोबत बसलेली दिसली होती. यासह एका पार्टीमध्ये देखील एकाच कारमधून जाताना दोघे स्पॉट झाले होते. यानंतरच हे दोघे एकमेकांना डेट करत असल्याच्या चर्चा सुरु झाल्या होत्या. मात्र दोघांनी अद्याप याबाबत कोणतेही भाष्य केलेले नाही. नव्या ही अमिताभ बच्चन यांची नातं असून सिद्धांत आतापर्यंत गली बॉयसह फोन भूत सारख्या चित्रपटांमध्ये दिसला आहे.





