Mrunal Thakur: धनुषसोबत लग्नाच्या अफवांवर मृणाल ठाकुरची प्रतिक्रिया; म्हणाली ‘खोटी चर्चा करणाऱ्यांचे…’
अफवांवर प्रतिक्रिया देताना मृणालने हसतच उत्तर दिलं. एका मुलाखतीत ती म्हणाली की, या अफवा तिला मजेदार वाटतात. “लोकांच्या मते तर माझं लग्नही झालं आहे,” असं ती गंमतीने म्हणाली. पुढे ती म्हणाली, “मी 3 कोटी, 6 कोटी किंवा 10 कोटी रुपये खर्च केले तरी एवढी प्रसिद्धी मिळाली नसती. त्यामुळे या खोट्या अफवा पसरवणाऱ्यांचे मी मनापासून आभार मानते.”

Mrunal Thakur: अभिनेत्री मृणाल ठाकुर सध्या तिच्या आगामी चित्रपट ‘दो दीवाने शहर में’ मुळे चर्चेत आहे. मात्र अलीकडे तिचं नाव अभिनेता धनुष याच्याशी जोडले जात आहे. काही ठिकाणी तर दोघे व्हॅलेंटाइन डे ला लग्न करणार असल्याच्याही बातम्या पसरल्या होत्या.
या अफवांवर प्रतिक्रिया देताना मृणालने हसतच उत्तर दिलं. एका मुलाखतीत ती म्हणाली की, या अफवा तिला मजेदार वाटतात. “लोकांच्या मते तर माझं लग्नही झालं आहे,” असं ती गंमतीने म्हणाली. पुढे ती म्हणाली, “मी 3 कोटी, 6 कोटी किंवा 10 कोटी रुपये खर्च केले तरी एवढी प्रसिद्धी मिळाली नसती. त्यामुळे या खोट्या अफवा पसरवणाऱ्यांचे मी मनापासून आभार मानते.”
तिने आपल्या वैयक्तिक आयुष्याबद्दलही स्पष्ट सांगितलं की, “मी खूप ओपन व्यक्ती आहे. माझ्या आयुष्यात काहीही घडलं तर मी स्वतः सगळ्यांसमोर सांगेन. सध्या माझा पार्टनर फक्त कॅमेरा आहे.” दरम्यान, धनुषसोबतच्या नात्याबाबत ना मृणालने ना धनुषने कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही.
वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर ‘दो दीवाने शहर में’ हा रोमँटिक ड्रामा चित्रपट 20 फेब्रुवारीला प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात मृणालसोबत सिद्धांत चतुर्वेदी मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. दिग्दर्शक रवि उदयवार यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं असून, निर्मिती संजय लीला भंसाली यांनी केली आहे.






