Navratri 2025 : नऊ दिवस, नऊ रंग… जाणून घ्या कोणत्या दिवशी कोणता रंग परिधान करावा

Navratri 2025: नवरात्र उत्सव 22 सप्टेंबरपासून सुरू होत आहे. नऊ दिवस देवीच्या नऊ स्वरूपांची पूजा केली जाते. प्रत्येक दिवशी एका विशिष्ट रंगाला विशेष महत्त्व असते. त्या रंगाचे वस्त्र परिधान केल्यास देवी प्रसन्न होते, अशी मान्यता आहे. हे रंग केवळ देवीच्या आवडीचे नसून तिच्या शक्ती, ऊर्जा आणि भावनांचे प्रतीक मानले जातात.
चला जाणून घेऊया नवरात्रातील प्रत्येक दिवशी कोणता रंग परिधान करावा.
पहिला दिवस – नारंगी
हा दिवस माता शैलपुत्री यांना समर्पित आहे. नारंगी रंग आनंद, उत्साह आणि ऊर्जा दर्शवतो.
दुसरा दिवस – पांढरा
या दिवशी माता ब्रह्मचारिणीची पूजा केली जाते. पांढरा रंग शांती व शुद्धतेचे प्रतीक आहे.
तिसरा दिवस – लाल
तिसऱ्या दिवशी देवी चंद्रघंटाची उपासना होते. लाल रंग धैर्य व शक्तीचे प्रतिक असून नकारात्मकता दूर करतो.
चौथा दिवस – निळा
माता कुष्मांडाची पूजा या दिवशी केली जाते. निळा रंग आत्मविश्वास वाढवतो व अपयश दूर करतो, अशी श्रद्धा आहे.
पाचवा दिवस – करडा
स्कंदमातेची आराधना या दिवशी होते. करडा रंग स्थिरता आणि संतुलनाचे प्रतीक मानला जातो.
सहावा दिवस – पिवळा
या दिवशी माता कात्यायनीची पूजा केली जाते. पिवळा रंग आनंद, समृद्धी आणि सकारात्मकतेचे द्योतक आहे.
सातवा दिवस – हिरवा
देवी कालरात्रिची उपासना या दिवशी केली जाते. हिरवा रंग धैर्य, आत्मबल आणि प्रगतीचे प्रतीक आहे.
आठवा दिवस – जांभळा
या दिवशी माता महागौरीची पूजा केली जाते. जांभळा रंग इच्छापूर्ती आणि अध्यात्माशी जोडला जातो.
नववा दिवस – मोरपंखी
शेवटच्या दिवशी देवी सिद्धिदात्रीची उपासना केली जाते. मोरपंखी रंग सौंदर्य आणि शक्तीचे प्रतीक आहे.
या नऊ रंगांचे पालन केल्याने देवीची कृपा लाभते, अशी लोकमान्यता आहे.



