Navneet Rana : “मी बाळासाहेबांची मुलगी, त्यांचे विचार घेऊन मैदानात आहे…” – नवनीत राणा
Updated On:

Navneet Rana – अमरावतीमध्ये दर्यापूर विधानसभा मतदारसंघातील खल्लार या गावात नवनीत राणा यांच्या सभेदरम्यान शनिवारी रात्र राडा झाला. याबाबत बोलताना त्या म्हणाल्या, ज्या गावात हा प्रकार घडला, ते गाव शिवसेना ठाकरे गटाच्या तालुकाध्यक्षांचे आहे.
त्या सभेला मला उशीर झाला. हे त्यांच्या लक्षात आल्यानंतर ते सभेसाठी आलेल्या महिला आणि लोकांबाबत अपशब्द बोलत होते. आज उद्धव ठाकरे हे उद्धव बाळासाहेब ठाकरे नाही, तर जनाब उद्धव ठाकरे झाले आहेत, हे काल स्पष्ट दिसले.
पण ते विसरले आम्हीसुद्धा बाळासाहेबांचे विचार घेऊन चालत आहोत. मी त्यांची मुलगी म्हणून त्यांचे विचार घेऊन मैदानात आहे, असे म्हणत नवनीत राणा यांनी उद्धव ठाकरेंवर टीकास्र डागले.





