नवज्योत कौर सिध्दू यांची कमल हासनवर टीका
Updated On:

नवी दिल्ली – स्वतंत्र हिंदुस्थानात महात्मा गांधी यांची हत्या करणारा नथुराम गोडसे पहिला हिंदू दहशतवादी होता, असे वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या कमल हासनला कॉंग्रेस नेत्या नवज्योत कौर सिद्धू यांनी चपराक लगावली आहे. दहशतवादाला कोणत्याही धर्माशी जोडणे चुकीचे असल्याचे मत त्यांनी मांडले.
मक्कल निधी मैय्यम पक्षाचे प्रमुख कमल हासन नथुराम गोडसे हा स्वतंत्र हिंदुस्थानातील पहिला हिंदू दहशतवादी होता असे वादग्रस्त विधान केले होते. याबाबत नवज्योत कौर म्हणाल्या, कमल हासन यांचे वक्तव्य चुकीचे आहे. दहशतवादी विचारधारेला कोणत्याही धर्माशी जोडणे चूक आहे, कारण या दोन्ही वेगळ्या गोष्टी आहेत.




