Raghav Chadha : खासदार राघव चड्डा यांना मारहाण? बड्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
Raghav Chadha : नवीन जयहिंद यांनी राघव चड्ढा यांना मारहाण झाल्याचा आरोप केला आहे. डोळ्याच्या शस्त्रक्रियेसाठी लंडनला जाण्यामागे हेच कारण असल्याचा दावा त्यांनी केला आहे.

Raghav Chadha : आम आदमी पक्षाचे खासदार राघव चड्ढा यांच्याबाबत एक खळबळजनक दावा समोर आला आहे. हरियाणाचे माजी आप प्रदेशाध्यक्ष नवीन जयहिंद यांनी सोशल मीडियावर व्हिडिओ शेअर करत चड्ढा यांना मारहाण करण्यात आल्याचा आरोप केला आहे.
जयहिंद यांच्या म्हणण्यानुसार, दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या अधिकृत निवासस्थान ‘शीशमहाल’ येथे चड्ढा यांना बोलावून मारहाण करण्यात आली. या घटनेदरम्यान त्यांना जबरदस्तीने उभे करून मारहाण केल्याचा दावा त्यांनी केला आहे.
या मारहाणीत चड्ढा यांच्या डोळ्याला दुखापत झाली होती आणि त्यावर पुढे इंग्लंडमध्ये उपचार करण्यात आल्याचेही जयहिंद यांनी सांगितले. त्या वेळी चड्ढा इंग्लंडला गेले असताना अनेकांनी ते वैयक्तिक कारणासाठी गेले असल्याचे समजले होते, मात्र आता या घटनेचा खुलासा करावा, अशी मागणी जयहिंद यांनी केली आहे.
हमसे ज़्यादा जानते हो क्या भाई तुम
प्रमाण तो पता नहीं क्या क्या है
कौन क्यो कैसे बनाया गया
रहने दो 🧐 https://t.co/4FAeQpCd6U
— नवीन जयहिन्द🇮🇳 (@NaveenJaihind) April 3, 2026
जयहिंद यांनी पोस्ट केलेल्या व्हिडिओनुसार, या घटनेवेळी काही वरिष्ठ नेतेही उपस्थित होते. मात्र, या प्रकरणावर राघव चड्ढा किंवा आम आदमी पक्षाकडून अधिकृत प्रतिक्रिया अद्याप समोर आलेली नाही.
दरम्यान, या दाव्यांमुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली असून या प्रकरणाची सत्यता काय आहे, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.





