Raghav Chadha meets PM Modi : खासदार राघव चड्ढा यांनी घेतली पीएम मोदींची भेट; राजकीय हालचालींना वेग
Raghav Chadha meets PM Modi : आप सोडून भाजपमध्ये प्रवेश केलेल्या राज्यसभा खासदार राघव चड्ढा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. तसेच पंतप्रधान मोदींनी घेतलेल्या एनडीए खासदारांच्या महत्त्वाच्या बैठकीचा सविस्तर आढावा.

Raghav Chadha meets PM Modi : आम आदमी पक्ष सोडून भाजपमध्ये प्रवेश केलेले राज्यसभा खासदार राघव चड्ढा यांनी शनिवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पोस्ट करत त्यांनी या भेटीची माहिती दिली.
पंतप्रधान मोदींसोबतची ही भेट आणि त्यांच्या मार्गदर्शनातून मिळालेला अनुभव सदैव स्मरणात राहील, अशा शब्दांत चड्ढा यांनी कृतज्ञता व्यक्त केली. चड्ढा यांच्यासह इतर सहा राज्यसभा खासदारांनी नुकताच आपला रामराम ठोकून भाजपमध्ये प्रवेश केला आहे.
यापूर्वी शुक्रवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या दिल्लीतील निवासस्थानी एनडीएतील घटक पक्षांच्या ४० हून अधिक खासदारांची चहापानादरम्यान भेट घेतली. या बैठकीत तृणमूल काँग्रेस सोडून नॅशनल सिटीझन्स पार्टी ऑफ इंडियामध्ये सामील झालेले खासदार आणि शिवसेना (उबाठा) मधून एकनाथ शिंदे गटात आलेले खासदार विशेष उपस्थित होते.
संसदेच्या पावसाळी अधिवेशनातील गोंधळ आणि कामकाजातील अडथळ्यांवर या बैठकीत प्रामुख्याने चर्चा झाली. या बैठकीला केंद्रीय मंत्री जे. पी. नड्डा आणि भाजप अध्यक्ष नितीन नवीन यांचीही उपस्थिती होती.





