Navale Bridge Accident – कात्रज बाह्यवळण मार्गावर नवले पूल परिसरात प्रवासी वाहतूक करणाऱ्या आराम बसच्या धडकेत दुचाकीस्वार कॉलेज तरुणाचा मृत्यू झाला असून त्याच्याबरोबर असलेली सहप्रवासी तरुणी जखमी झाली.नितीन जुनवणे ( १९, रा. धायरी फाटा, सिंहगड रस्ता) असे मृत्युमुखी पडलेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे. अपघातात नितीन जुनवणेची सहप्रवासी मैत्रीण जखमी झाली. मैत्रिणीने याबाबत भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रादार तरुणी आणि दुचाकीस्वार नितीन हे महाविद्यालात शिक्षण घेत आहेत. १२ फेब्रुवारी रोजी दुचाकीस्वार नितीन आणि मैत्रीण नवले पूल परिसरातून कात्रजकडे रात्री निघाले होते. त्यावेळी प्रवासी वाहतूक करणाऱ्या आराम बसने दुचाकीला धडक दिली. अपघातात दोघेजण जखमी झाले. गंभीर जखमी झालेल्या दुचाकीस्वार नितीन याचा रुग्णालयात उपचारापूर्वींच मृत्यू झाला. अपघातानंतर पसार झालेल्या आराम बस चालकाचा शोध घेण्यात येत आहे. पोलीस उपनिरीक्षक प्रियंका निकम तपास करत आहेत.