राष्ट्रवादी काँग्रेसचे हर्षवर्धन मानकर यांचा रामबाग कॉलनी-शिवतीर्थनगरमधून उमेदवारी अर्ज दाखल
Updated On:

कोथरूड : रामबाग काॅलनी- शिवतीर्थनगर प्रभाग क्र. ११ मधील अ गटातून (नागरिकांचा मागास प्रवर्ग) राष्ट्रवादी काँग्रेसचे हर्षवर्धन दीपक मानकर यांनी उमेदवारी अर्ज भरला. या वेळी ब गटातून (सर्वसाधारण महिला) तृप्ती नीलेश शिंदे आणि क गटातून (सर्वसाधारण महिला) कांता नवनाथ खिलारे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले.
रामबाग कॉलनी- शिवतीर्थनगर प्रभागातील नागरिकांच्या प्रश्नांसाठी सातत्याने काम करण्याची आणि लोकहिताला प्राधान्य देण्याची माझी भूमिका असल्याचे हर्षवर्धन मानकर यांनी सांगितले. माझे वडील दीपक मानकर यांनी गेली अनेक वर्षे या प्रभागात नगरसेवक असताना विकासाला गती दिली. मीही गेल्या सात वर्षांपासून या प्रभागात लोकसेवेचे काम करीत असल्याचे मानकर यांनी सांगितले.





