Ram Mandir Donation Case : राममंदिर लूटप्रकरणी पंतप्रधान मोदी शांत का? काँग्रेसचा जोरदार प्रहार, नेमकं काय म्हणाले…
Ram Mandir Donation Case : जयराम रमेश म्हणाले की, मोदी सरकारने कोणत्याही पारदर्शक निकषांशिवाय किंवा सार्वजनिक चर्चेविना श्री राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टची स्थापना केली.

Ram Mandir Donation Case – अयोध्येतील राम मंदिरासाठी मिळालेल्या देणग्यांच्या कथित अफरातफरीवरून वाद वाढत असताना, काँग्रेसने मंगळवारी म्हटले की, या लूटप्रकरणी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मौन हे देशभरातील कोट्यवधी लोकांच्या आस्थेवर थेट प्रहार आहे. (Ram Mandir Donation Case)
आपल्या दैनंदिन पत्रकार परिषदेत काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश म्हणाले की, मोदी सरकारने कोणत्याही पारदर्शक निकषांशिवाय किंवा सार्वजनिक चर्चेविना श्री राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टची स्थापना केली. (Ram Mandir Donation Case)
त्या संस्थेत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या सदस्यांची नियुक्ती केली. त्यानंतर, संपूर्ण ट्रस्टला माहिती अधिकार कायद्याच्या कक्षेतून वगळण्यात आले. म्हणून मोदीजी, तुमचे मौन सोडा आणि या प्रकारावर व्यक्त व्हा. (Ram Mandir Donation Case)
रमेश पुढे म्हणाले की, भाजप सरकारच्या हुकूमशाहीने कळस गाठला आहे! उत्तर प्रदेश काँग्रेसचे एक शिष्टमंडळ ३० जून रोजी प्रभू श्री रामाचे दर्शन आणि आशीर्वाद घेण्यासाठी अयोध्येला जाणार होते. (Ram Mandir Donation Case)
मी अयोध्येत पोहोचलोच होतो, तितक्यात भीतीपोटी भाजप सरकारने पोलिसांकडून मला हॉटेलमध्ये अटक करवली आणि जीपमधून नेले जात आहे, असे राय म्हणाले होते.
आता काँग्रेसने सर्वोच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली चौकशी करण्याची आणि श्री राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्ट बरखास्त करण्याची मागणी केली आहे. काँग्रेसचा दावा आहे की, भारतीय स्टेट बॅंकेने तीन महिन्यांपूर्वीच राम मंदिराच्या देणगी मोजणी केंद्रावर नियुक्त असलेल्या अधिकाऱ्यांना हटवण्याची विनंती केली होती. (Ram Mandir Donation Case)






