राष्ट्रीय एकता दिवस ; सीआरपीएफच्या महिला योद्धयांचे रायफल ड्रिलचे प्रात्यक्षिक

नवी दिल्ली : आज देशात राष्ट्रीय एकता दिवस साजरा करण्यात येत आहे. यानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुजरातच्या केवीयाडमध्ये स्टॅच्यू ऑफ युनिटी येथे जाऊन सरदार वल्लभभाई पटेल यांना श्रद्धांजली वाहिली. दरम्यान, या कार्यक्रमात केवीयाडमध्ये केंद्रीय राखीव सशस्त्र दल, सीमा सुरक्षा दल, इंडो-तिबेट सीमा पोलिस, केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दले आणि राष्ट्रीय सुरक्षा रक्षकांचे पोलिस दलाकडून प्रात्यक्षिके करण्यात आली. यावेळी सर्वांचे आकर्षणाचे केंद्र बनले ते म्हणजे सीआरपीएफच्या महिला अधिकारी…परेडमध्ये सहभागी झालेल्या सीआरपीएफच्या महिला अधिकाऱ्यांनी रायफल ड्रिलचे प्रात्यक्षिक सादर केले.
“कदम कदम बढाये जा…”या गाण्यावर सीआरपीएफच्या महिला योद्धांनी आपल्या रायफल ड्रिलचे प्रात्यक्षिक सादर केले. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व प्रात्यक्षिकांना आपली हजेरी लावली. या प्रात्यक्षिका दरम्यान, ‘सारे जहां से अछा, हिंदुस्तान हमारा…’ या गाण्याचा सूर स्टॅच्यू ऑफ युनिटीभोवती घुमत होता. गुजरात राज्य व केंद्रीय राखीव सशस्त्र दल, सीमा सुरक्षा दल, इंडो-तिबेट सीमा पोलिस, केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दले आणि राष्ट्रीय सुरक्षा रक्षकांचे पोलिस दले या परेडमध्ये सहभागी झाले होते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी गुजरातमध्ये राष्ट्रीय एकता दिवस (राष्ट्रीय एकता दिवस) कार्यक्रमात भाग घेतला. पंतप्रधानांचा दोन दिवसीय गुजरात दौरा सुरु आहे. यासाठी कालच ते गुजरातमध्ये दाखल झाले आहेत. दौऱ्यातील दुसऱ्या दिवशी म्हणजे आज सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त कार्यक्रमांमध्ये भाग घेतला. यावर्षी पटेल यांची 145 वी जयंती आहे.
पंतप्रधान मोदींनी स्टॅच्यू ऑफ युनिटी येथे पुष्पांजली वाहिली आणि एकता प्रतिज्ञा केली. यानंतर पंतप्रधान गुजरातमधील पहिल्या सीपलेन सेवेचे उद्घाटन करतील आणि 31 ऑक्टोबरपासून ते राज्यातील लोकांना समर्पित करण्यात येणार आहे.




