National Sports Day: संजीवनीचा खेळाडू म्हणजे विजेता’! प्रशिक्षण, सुविधा आणि यशाचा त्रिवेणी संगम
National Sports Day: शालेय ते विद्यापीठ स्तरापर्यंत जागतिक दर्जाच्या क्रीडा सुविधा आणि तज्ज्ञ प्रशिक्षक; संजीवनी समूहाची क्रीडा संस्कृती ठरतेय प्रेरणादायी.

National Sports Day: शालेय ते विद्यापीठ स्तरापर्यंत विद्यार्थ्यांना विविध खेळांमध्ये प्राविण्य मिळविण्याची संधी संजीवनीमध्ये उपलब्ध आहे. क्रिकेट, फुटबॉल, व्हॉलीबॉल, कबड्डी, खो-खो, बास्केटबॉल, बॅडमिंटन, टेबल टेनिस, अॅाथलेटिक्स, योग, बुद्धिबळ यांसह विविध खेळांसाठी स्वतंत्र सुविधा आणि प्रशिक्षित मार्गदर्शक उपलब्ध आहेत. जिल्हा, विभागीय, राज्य तसेच राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धांमध्ये संजीवनीच्या खेळाडूंनी सातत्याने उल्लेखनीय कामगिरी केली आहे.
पदके, विजेतेपदे आणि वैयक्तिक पुरस्कारांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी संस्थेचा क्रीडा क्षेत्रातील लौकिक वाढविला आहे. त्यामुळे ‘संजीवनीचा खेळाडू म्हणजे विजेता’ ही ओळख अधिक दृढ होत आहे. संस्थेच्या या यशामागे अत्याधुनिक सुविधा जितक्या महत्त्वाच्या आहेत, तितकीच प्रशिक्षित आणि अनुभवी प्रशिक्षकांची भूमिका आहे. प्रत्येक खेळासाठी तज्ज्ञ प्रशिक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे.
राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळलेल्या प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांना तांत्रिक कौशल्य, शारीरिक क्षमता, फिटनेस आणि स्पर्धात्मक मानसिकता विकसित करण्याचे प्रशिक्षण दिले जाते. वर्षभर प्रशिक्षण शिबिरे, फिटनेस सेशन्स, स्पर्धा आणि विशेष मार्गदर्शन कार्यक्रम आयोजित केले जातात. विद्यार्थ्यांच्या क्षमतेनुसार प्रशिक्षणासाठी आराखडे तयार करून प्रत्येक खेळाडूला स्वतःच्या गुणवत्तेचा सर्वोत्तम विकास करण्याची संधी दिली जाते.
क्रीडा संस्कृतीचा नवा अध्याय
संजीवनी समूहातील विविध संस्थांच्या कामगिरीकडे पाहता क्रीडा क्षेत्राला दिलेले सातत्यपूर्ण प्रोत्साहन आता परिणामकारक ठरत असल्याचे स्पष्ट होते. दर्जेदार सुविधा, तज्ज्ञ प्रशिक्षक, नियोजनबद्ध प्रशिक्षण, स्पर्धांचा सातत्यपूर्ण अनुभव आणि विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेवर असलेला विश्वास या बळावर संजीवनीने क्रीडा क्षेत्रात स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. शिक्षण आणि क्रीडा यांचा समतोल साधत विद्यार्थ्यांना राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर संधी उपलब्ध करून देण्याचा हा प्रवास भविष्यात आणखी व्यापक होण्याची अपेक्षा आहे. संजीवनीच्या क्रीडा संस्कृतीतून घडणारे खेळाडू संस्थेचे नाव देश-विदेशात उज्ज्वल करतील, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
राष्ट्रीय स्तरावर उपस्थिती
वर्ष 2025-26 मध्ये संजीवनी विद्यापीठाने राष्ट्रीय, विभागीय आंतरविद्यापीठ क्रीडा स्पर्धांमध्ये उल्लेखनीय सहभाग नोंदविला. अखिल भारतीय आंतरविद्यापीठ बेसबॉल (पुरुष) स्पर्धेत विद्यापीठाने पाचवे स्थान मिळविले. सॉफ्टबॉल (पुरुष) स्पर्धेत अव्वल दहामध्ये स्थान मिळविले. फेन्सिंग महिला सॉफ्टबॉल, क्रिकेट आणि पुरुष बास्केटबॉलमध्येही खेळाडू सहभागी झाले. आठवी अंडर-15 महिला सॉफ्टबॉल आशिया चषक 2026 आणि दुसरी आशियाई विद्यापीठ महिला सॉफ्टबॉल चषक 2026 यांच्या निवड चाचण्यांचे आयोजन संजीवनी विद्यापीठाने केले. या उपक्रमांमुळे विद्यापीठाची क्रीडा आयोजन आणि खेळाडू विकासातील क्षमता अधोरेखित झाली.
पॉलिटेक्निकचे व ज्युनियरमहाविद्यालयाची भरारी संजीवनी के. बी. पी. पॉलिटेक्निकच्या विद्यार्थ्यांनी विभागीय क्रीडा स्पर्धांमध्ये फुटबॉल आणि व्हॉलीबॉलमध्ये विजेतेपद मिळविले. बास्केटबॉलमध्ये उपविजेतेपद मिळाले. मुलींच्या कॅरम, व्हॉलीबॉल, बास्केटबॉल आणि बॅडमिंटन संघांनी विजेतेपद मिळवत राज्यस्तरीय स्पर्धांसाठी पात्रता मिळविली. कुस्ती, वेटलिफ्टिंग आणि अॅकथलेटिक्समधील खेळाडूंचीही राज्यस्तरीय स्पर्धांसाठी निवड झाली. राज्यस्तरीय स्पर्धेत व्हॉलीबॉल संघानेही अव्वल कामगिरी केली.
संजीवनी ज्युनिअर कॉलेजच्या खेळाडूंनीही 2025-26 मध्ये जिल्हा, विभागीय आणि राष्ट्रीय स्तरावर यश मिळविले. फेन्सिंगमध्ये जिल्हास्तरीय विजेतेपदासह विभागीय पात्रता मिळाली. महिला सॉफ्टबॉल संघाने जिल्हास्तरावर प्रथम क्रमांक पटकावला, तर बेसबॉलमध्ये मुला-मुलींच्या संघांनी द्वितीय क्रमांक मिळविला. 43 व्या ज्युनिअर राष्ट्रीय सॉफ्टबॉल अजिंक्यपद स्पर्धेसाठी महाविद्यालयातील एक मुलगा आणि एका मुलीची निवड झाली. त्यापैकी मुलांच्या संघातील खेळाडूने सुवर्णपदक (खेळाडूचे नाव हवे) मिळविले, तर मुलींच्या संघाने सहावा क्रमांक मिळविला.
जागतिक दर्जाच्या सुविधा
संजीवनीमध्ये विविध खेळांसाठी सुसज्ज मैदाने, अत्याधुनिक उपकरणे आणि आवश्यक क्रीडा साहित्य उपलब्ध आहे. खेळाडूंच्या शारीरिक तंदुरुस्तीसाठी आधुनिक जिमखाना असून, फिटनेस मशिन्स आणि प्रशिक्षित मार्गदर्शकांच्या मदतीने खेळाडूंच्या क्षमता विकसित केल्या जातात. त्यासह पोषण, योग्य आहार, आरोग्यविषयक मार्गदर्शन आणि मानसिक तयारीलाही महत्त्व दिले जाते. खेळाडूंना अनेकदा ऐन मोक्याच्या क्षणी ताणाला सामोरे जावे लागते. त्यासाठी तणाव व्यवस्थापन आणि आत्मविश्वास वाढविणारे उपक्रम केले जातात. त्यामुळे विद्यार्थी स्पर्धात्मक वातावरणात अधिक प्रभावीपणे कामगिरी करू शकतात.
अभियांत्रिकीची पदकांची कमाई
संजीवनी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनीही वर्ष 2025-26 मध्ये राष्ट्रीय आणि आंतरविभागीय स्पर्धांमध्ये चमकदार कामगिरी केली. अखिल भारतीय आंतरविद्यापीठ निवड स्पर्धेतील फेन्सिंगच्या एपी प्रकारात यश गावली यांची निवड झाली. आंतरविभागीय स्पर्धेत बास्केटबॉलमध्ये श्रेयस काजळे याने उपविजेतेपद मिळविले. सॉफ्टबॉलमध्ये कुणाल भुजबळ अणि सागर पवार यांनी दुसरा क्रमांक मिळविला. महिला सॉफ्टबॉलमध्ये श्रुती मालवडे, रिया बर्हाटे आणि साक्षी राऊत यांनीही दुसरा क्रमांक मिळविला. बेसबॉलमध्ये कुणाल भुजबळ व श्रीनाथ माकोणे, तर महिला नेटबॉलमध्ये तृप्ती गोडे, नीलम परांडे, ईश्वरी गाडे, रेवा पवार, सिद्धी तांबे आणि वैष्णवी मगर यांनी तिसरा क्रमांक मिळविला.
क्रीडेतून नेतृत्व आणि व्यक्तिमत्त्व विकास
खेळ विद्यार्थ्यांना केवळ पदके मिळवून देत नाही, तर जीवनातील अनेक महत्त्वाचे गुणही शिकवतो. संघभावना, नेतृत्व, शिस्त, वेळेचे नियोजन, निर्णयक्षमता, संयम आणि संकटांना सामोरे जाण्याची ताकद क्रीडा प्रकारातून विकसित होते. त्यामुळे प्रत्येक विद्यार्थ्याने किमान एका खेळात सहभागी व्हावे, यासाठी संजीवनीमध्ये प्रोत्साहन दिले जाते. खेळाडू घडविण्याबरोबरच जबाबदार आणि आत्मविश्वासू नागरिक घडविण्याचे कामही या क्रीडा संस्कृतीतून होत आहे.
स्कूलची पदक वाटचाल
संजीवनी इंटरनॅशनल स्कूल, शिर्डीच्या विद्यार्थ्यांनी जिल्हा, राज्य आणि राष्ट्रीय स्तरावर उल्लेखनीय कामगिरी केली. (खेळ कोणता?) एमएलबी कपच्या प्रादेशिक स्पर्धेसह बेंगळुरू येथील अंतिम फेरीत सुवर्णपदक मिळवले. डीएसओ बेसबॉल अंडर-14 मुलांच्या गटात सुवर्ण, तर मुलींच्या अंडर-14 आणि अंडर-17 गटात रौप्यपदक मिळाले. सॉफ्टबॉलमध्येही विविध वयोगटांत सुवर्ण, रौप्य आणि कांस्यपदकांची कमाई झाली. जिम्नॅस्टिक्स, स्केटिंग आणि जलतरणातही विद्यार्थ्यांनी पदके पटकावली. 10व्या सब-ज्युनियर राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धेत सुवर्णपदक, तर राष्ट्रीय सीबीएसई एरोबिक्स अजिंक्यपद स्पर्धेत कांस्यपदक मिळाले.
– शंकर दुपारगुडे







