National Games 2023 (Wushu) : महाराष्ट्राच्या वुशू संघाला तीन पदके

पुणे :– गोवा येथे सुरू असलेल्या 37 व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेमध्ये महाराष्ट्र संघाच्या श्रावणी कटके हिने तावलू इव्हेंट ताईजी जेन प्रकारामध्ये रजतपदक पटकावले. तर सलोनी जाधव हिने तावलू इव्हेंट नंदाऊ प्रकारात रजतपदक आणि विशाल शिंदे याने 85 किलो वजन गटात ब्रॉंझपदक पटकावले.
वुशू खेळामध्ये महाराष्ट्र राज्याला दोन रजत व एक ब्रॉंझ अशी तीन पदके मिळालेली आहेत. या स्पर्धेमध्ये सोपान कटके यांनी चिफ ज्युरी म्हणून काम पाहिले. खेळाडूंना सांडा प्रशिक्षक अविनाश पाटील ताऊलू प्रशिक्षक प्रतीक्षा शिंदे यांचे मार्गदर्शन लाभले.
टीम मॅनेजरपदी महेश इंदापुरे यांनी काम पाहिले. वुशू हा क्रीडा प्रकार सांडा व ताऊलू या दोन प्रकारात खेळला जातो. महाराष्ट्र शासनाकडून विजयी खेळाडूंना सुवर्णपदक सात लाख, रजतपदक पाच लाख, ब्रॉंझपदक तीन लाख रुपये रक्कम बक्षीस देण्यात येणार आहे.





