National Games 2023 (weightlifting) : कोमल वाकळे सुवर्णपदकाची मानकरी…
Updated On:

पणजी :- राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेतील वेटलिफ्टिंग क्रीडा प्रकारातील महिलांच्या 87 किलो वजनी गटात शनिवारी महाराष्ट्राच्या कोमल वाकळे हिने उत्कृष्ट कामगिरी करत सुवर्ण पदकावर नाव कोरले.
कोमलने स्नॅचमध्ये 93 किलो तर क्लीन-जर्कमध्ये 112 किलो असे एकूण 205 किलो वजन उचलले. कोमलने स्नॅचमध्ये तिसऱ्या प्रयत्नात 96 किलो वजन उचलण्याचा केलेला प्रयत्न अपयशी ठरला.
कर्नाटकच्या उषा बीएनने 203 किलो (स्नॅच 94, क्लीन-जर्क 108) वजन उचलून दुसरा क्रमांक मिळवताना रौप्य पदक मिळवले. तर हरयाणाच्या राखीने 196 किलो (स्नॅच 87, क्लीन-जर्क 109) वजन उचलून तिसरा क्रमांकाकर राहत कांस्य पदक पटकावले.





