Asian Junior Weightlifting C’ships 2024 : भारताच्या मार्टिनाची रौप्यपदकाला गवसणी….
Updated On:

Asian Junior Weightlifting Championships 2024 : भारताची लिफ्टर मार्टिना देवीने बुधवारी आशियाई ज्युनियर वेटलिफ्टिंग स्पर्धेच्या महिलांच्या कनिष्ठ गटातून 87 किलोवरील वजनी गटात रौप्य पदकाची कमाई केली.
मणिपूरच्या 18 वर्षांच्या मार्टिना देवीने एकूण 225 किलो वजन उचलताना दुसरे स्थान मिळविले. तिनं क्लीन अँड़ जर्कसाठी रौप्य तर स्नॅकसाठी कांस्यपदक जिंकले.
Asian Youth Weightlifting C’ship 2024 : भारताच्या ज्योश्ना साबरची सुवर्णपदकाला गवसणी…
मार्टिनाने या वर्षाच्या किशोर गटात खेळताना स्नॅचमध्ये 101 किलो आणि क्लीन अँड जर्कमध्ये 136 किलो वजन उचलून राष्ट्रीय विक्रमाची नोंद केली होती. स्नॅच, क्लीन आणि जर्क आणि कॉन्टिनेंटल, वर्ल्ड कप आणि वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये एकूण लिफ्टसाठी मेडल्स स्वतंत्रपणे दिले जातात.





