Asian Youth Weightlifting C’ship 2024 : भारताच्या ज्योश्ना साबरची सुवर्णपदकाला गवसणी…

Asian Youth Weightlifting Championships 2024 – भारताची युवा वेटलिफ्टर ज्योश्ना साबरने शुक्रवारी आशियाई युवा वेटलिफ्टिंग चॅम्पियनशिपमध्ये ४० किलो वजनी गटात नव्या आशियाई विक्रमासह सुवर्णपदक पटकावले. याचबरोबरीने पायलने देखील ४५ किलो वजनी गटातून सुवर्णपदकाला गवसणी घालताना स्पर्धेच्या पहिल्याच दिवशी २ सुवर्णपदकांची कमाई केली. भारताने दिवसभरात २ सुवर्ण व १ कांस्य पदक मिळविले.
#KheloIndia youth athlete Jyoshna Sabar, who trains at SAI Patiala, puts up a remarkable effort to claim India’s first #Gold medal at the #2024AsianJuniorYouthWeightliftingChampionships in 🇶🇦 Qatar. pic.twitter.com/1oMBDWu9Er
— Khelo India (@kheloindia) December 19, 2024
भारताची युवा वेटलिफ्टर ज्योश्ना साबरने ४० किलो वजनी गटामध्ये दमदार कामगिरी केली. तिने स्नॅच मध्ये ६० किलो तर क्लीन अँड जर्कमध्ये ७५ किलो असे एकूण १३५ किलो वजन उचलताना सुवर्णपदक पटकावले. भारताच्या पायलने ४५ किलो वजनी गटाच्या अंतिम फेरीत स्नॅचमध्ये ७० तर क्लीन अँड जर्कमध्ये ८५ असे १५५ किलो वजन उचलताना सुवर्णपदक मिळविले.
मुलांच्या ४९ किलो वजनी गटातून भारताच्या बाबूलाल हेमब्रोमने कांस्यपदक मिळविले. त्याने स्नॅचमध्ये ८८ किलो तर क्लीन अँड जर्कमध्ये १०९ असे एकूण १९७ किलो वजन उचलताना कांस्यपदकावर आपली मोहोर लावली.





