Devendra Fadnavis : भोर तालुक्यातील नसरापूर येथे घडलेल्या चिमुकलीवरील अत्याचार आणि हत्येच्या घटनेनंतर राज्यभर संतापाची लाट उसळली आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठा निर्णय घेत लैंगिक गुन्ह्यांतील आरोपींना पॅरोल मिळू नये यासाठी कायद्यात बदल करण्याचे निर्देश दिले आहेत. मंत्रिमंडळ बैठकीत या प्रकरणावर सविस्तर चर्चा करण्यात आली असून, विधी व न्याय विभागाला आवश्यक ती कारवाई करण्यास सांगण्यात आले आहे. (Devendra Fadnavis) शुक्रवारी (१ मे) उघडकीस आलेल्या या धक्कादायक घटनेत साडेतीन वर्षांच्या बालिकेवर अत्याचार करून तिची निर्घृण हत्या करण्यात आली होती. या घटनेनंतर संतप्त ग्रामस्थांनी पुणे-बंगळुरू महामार्ग रोखत तीव्र आंदोलन केले, तसेच बंद पाळून निषेध नोंदवला. (Devendra Fadnavis) या प्रकरणात आरोपी भीमराव कांबळे याला अटक करण्यात आली असून न्यायालयाने त्याला ७ मेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. त्याच्यावर हत्या, बलात्कार आणि POCSO Act अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. विशेष म्हणजे, आरोपीविरोधात यापूर्वीही विनयभंग आणि पोक्सोअंतर्गत गुन्ह्यांची नोंद असल्याचे समोर आले आहे. (Devendra Fadnavis) Devendra Fadnavis : नसरापूर प्रकरणात फडणवीसांचा मोठा निर्णय; कायद्यात बदल करण्याचे निर्देश आरोपीने बालिकेची दगडाने ठेचून हत्या केल्यानंतर मृतदेह शेणाच्या ढिगाऱ्याखाली लपवून ठेवला होता. या अमानुष घटनेमुळे सर्वत्र तीव्र संताप व्यक्त होत असून आरोपीला कठोर शिक्षा देण्याची मागणी होत आहे. (Devendra Fadnavis) दरम्यान, तपासासाठी विशेष तपास पथक (SIT) स्थापन करण्यात आले असून साक्षीदारांचे जबाब नोंदवण्याचे काम सुरू आहे. राज्यातील विविध ठिकाणी या घटनेच्या निषेधार्थ मोर्चे काढले जात आहेत. सोलापूरमध्येही नागरिकांनी कॅण्डल मोर्चा काढत निषेध व्यक्त केला. (Devendra Fadnavis) या पार्श्वभूमीवर, गंभीर गुन्ह्यांतील आरोपींना पॅरोल देण्याच्या प्रक्रियेत कठोर बदल करण्याची गरज असल्याचे सरकारने स्पष्ट केले आहे. (Devendra Fadnavis)