Nashik News: ‘….अन्यथा त्यांची पाठ सोलून काढा’; भाजपच्या ‘या’ बड्या नेत्याचा सकल हिंदू समजला थेट पाठिंबा

Nashik News | Sakal Hindu Samaj Rally: नाशिकमध्ये हिंदू समाजाकडून बंद पुकारण्यात आला होता. बांगलादेशात हिंदूंच्या विरूद्ध सुरू असलेल्या हिंसाचाराचा निषेध करण्यासाठी हा बंद पुकारण्यात आला. पण त्या ठिकाणी
नाशिकमध्ये सकल हिंदू समाजाच्या वतीने बंदची हाक देण्यात आली होती. बांगलादेशात हिंदू अल्पसंख्याकांवर होत असलेल्या अत्याचाराच्या विरोधात सकल हिंदू समाजाच्या वतीने बंदची हाक पुकारण्याच आली होती. सकल हिंदू समाजाने पुकारलेल्या बंदला हिंसक वळण लागताना पाहायला मिळत आहे.
नाशिकच्या सकल हिंदू समाजाच्या मोर्चादरम्यान दुकानं बंद करण्यावरुन दोन गट समोर आल्याने तणावाची परिस्थिती निर्माण झाली आहे. शहरात मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
आंदोलनकर्त्यांकडून नाशिकमधील काही दुकानांची तोडफोड करण्यात आली आहे. दोन गटात दगडफेकीची घटना घडल्यानंतर या बंदला गालबोट लागलं.
दरम्यान, या संपूर्ण घटनेवर भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनी प्रतिक्रिया दिली. “कायदा कुणीही हातात घेऊ नये. दगडफेक करण्याचा प्रयत्न झाला असेल, तशी सुरुवात झाली असेल तर त्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे.
सकल हिंदू समाज इथे मोर्चा नाही काढणार तर कुठे काढणार? सकल हिंदू समाज भावना व्यक्त करत असेल तर त्याचं स्वागत आहे. या मोर्चामुळे ज्यांचं पोट दुखत असेल त्यांची पाठ सोलून काढा असं आमचं पोलिसांना आवाहन आहे”, असं आशिष शेलार म्हणाले.





