Tehsildar Arrested : मोठी कारवाई..! नायब तहसीलदाराला अटक, महाराष्ट्रात खळबळ
Tehsildar Arrested : नाशिकमधील म्हाडा भूखंड घोटाळा प्रकरणात नायब तहसीलदार नितीन पाटील यांना अटक करण्यात आली आहे.

Tehsildar Arrested : नाशिकमध्ये गाजत असलेल्या म्हाडा भूखंड घोटाळा प्रकरणात पोलिसांनी मोठी कारवाई करत नायब तहसीलदार नितीन पाटील यांना अटक केली आहे. क्राइम ब्रांचच्या पथकाने गंगापूर रोडवरील त्यांच्या निवासस्थानातून त्यांना ताब्यात घेतले. (Tehsildar Arrested)
तपासादरम्यान समोर आलेल्या माहितीनुसार, एकूण ४९ प्रकरणांपैकी ३१ प्रकरणांमध्ये बनावट कागदपत्रांमध्ये फेरफार करून नोंदी बदलल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. नितीन पाटील हे सध्या नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयात नायब तहसीलदार प्रशासन म्हणून कार्यरत आहेत. (Tehsildar Arrested)
अटकेनंतर त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले असता, कोर्टाने त्यांना तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. म्हाडा भूखंड घोटाळ्यातील आतापर्यंतची ही सर्वात मोठी कारवाई मानली जात असून, या प्रकरणामुळे नाशिकमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. (Tehsildar Arrested)
हेही वाचा :
MHADA Lottery: म्हाडाच्या सोडती तूर्तास नकोच! निवडणूक आयोगाने परवानगी नाकारली
Pune MHADA Lottery: आचारसंहिता संपताच ‘म्हाडा’ची सोडत निघणार; आढळराव पाटलांची माहिती





