Nashik Bus Accident : 400 फूट दरीत कोसळलेली बस अखेर बाहेर काढली !

नाशिक – सप्तशृंग गडावरील घाट रस्तात काही दिवसांपूर्वी (दि. 12 जुलै) सकाळी एस. टी. बस कोसळून 25 प्रवासी जखमी गंभीर झाले होते. सकाळी पावणे सातच्या सुमारास ही घडताना घडली होती.
स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, अपघातग्रस्त बस खामगाव आगाराची असून सकाळी 8.30 वाजता ही बस सप्तशृंगी गडाच्या दिशेने रवाना झाली. त्यानंतर बस सप्तशृंगी गडावर रात्री मुक्कामाला होती.
त्यानंतर पुन्हा सप्तशृंगी गड ते खामगाव (बुलढाणा) असा बसचा प्रवास सुरू झाला होता. वणीच्या सप्तशृंगी गडावरून खाली येत असलेल्या बसला मोठा अपघात झाला असून बस थेट 400 फूट दरीत कोसळली आहे. या घटनेत 25 प्रवासी जखमी झाले होते.
दरम्यान, आता दरीत कोसळलेली ही बस बाहेर काढण्यात आली आहे. अपघात ग्रस्त बस दरीच्या बाहेर काढण्याचे काम युद्धपातळीवर आज सकाळी दहा वाजता सुरु केले होते.
3 क्रेनसह आपत्ती व्यवस्थापन, कळवण बस आगार, पोलीस प्रशासन, वन विभाग तसेच स्थानिक ग्रामपंचायतीतील ग्रामस्थ यांच्या मदतीने बस दरीतून काढण्याची कार्यवाही पूर्ण केली. बस काढण्यासाठी हा रस्ता बंद करण्यात आला होता.





