Nashik Accident : नाशिक येथील अपघातात चौघांचा दुर्दैवी मृत्यू तर, नऊ जण गंभीर जखमी
Updated On:

नाशिक – नाशिक जिल्ह्यातील वणी-सापुतारा महामार्गावर खोरी फाट्या जवळ मारुती व क्रूझर यांच्यात समोरासमोर धडक झाल्याने चार जणांचा मृत्यू झाला असून नऊ जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींवर जवळच्या ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
विनायक क्षिरसागर (वय 37), योगेश वाघ (18), जतिन फावडे (23) आणि रविंद्र चव्हाण (22) अशी मृतांची नावे आहेत. हा अपघात शुक्रवारी सायंकाळी खोरी फाटा जवळ क्रुझर व मारुती यांच्यात समोरासमोर जोरदार धडक झाली.
हा अपघात इतका भीषण होता की यात चार जणांचा मृत्यू झाला असून 9 जण गंभीर जखमी झाले. अपघातानंतर आजूबाजूच्या नागरिकांनी धाव घेत जखमींना बाहेर काढले. या सर्वांना वणी ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचारानंतर त्यांना 108 रुग्णवाहिकेने जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले.





