नर्मदा ट्रॅव्हल्सला सलग तिसऱ्यांदा बेस्ट बस ऑपरेटर ऑफ द इयर 2024 पुरस्कार जाहीर

निश्चित स्थळी, निश्चित वेळी स्वच्छ व सुरक्षित प्रवास घोष वाक्य घेऊन 2009 ला दोन ट्रॅव्हल्स घेऊन सुरु केलेला प्रवास, स्वच्छ,सुखकर, आरामदायी आणि प्रेमळ वागणूक व पॅसेंजरच्या प्रेमामुळे नर्मदा ट्रॅव्हल्स च्या शिरपेचात सलग तिसऱ्यांदा मानाचा तुरा रोवला गेला. प्रवास एक्सलन्सचे दोन अवॉर्ड वेस्ट झोन भारतातील पाच राज्यातील बेस्ट बस ऑपरेटर ऑफ द इयर 2024,प्रथम पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
कर्नाटक बंगलोर येथे,बोकी प्रवास व रेडबस च्या माध्यमातून, कर्नाटक चे उप मुख्यमंत्री श्री डी के शिवकुमारजी यांच्या अध्यक्षतेखाली तामिळनाडू चे परिवहन मंत्री शिवाशंकरजी यांच्या हस्ते तसेच boci इंडिया चे अध्यक्ष श्री प्रसन्न पटवर्धन सर, रेड बस चे सिओ प्रकाश संगम, यांच्या उपस्थितीत सन्मानित करण्यात आले. नर्मदा ट्रॅव्हल्स साठी 2019 ला केंद्रीय परिवहन मंत्री मा श्री नितीन गडकरी, 2022 हैद्राबाद येथे याच पुरस्काराने सन्मानित करण्यात आले यावेळी नर्मदा ट्रॅव्हल्स ने हॅट्रिक केली आहे.
सदर पुरस्कार मिळाल्या बद्दल लातूर जिल्ह्याचे खासदार डॉ श्री शिवाजी काळगे यांनी त्यांचे अभिनंदन केले. तसेच,लातूर जिल्हा ट्रॅव्हल्स असोसिएशन चे संस्थापक अध्यक्ष सुनील देशपांडे, अध्यक्ष बबलू तोषनिवाल,सचिव विश्वास कुलकर्णी,तसेच उदगीर ट्रॅव्हल्स संघटनेचे अध्यक्ष विठ्ठल जाधव तसेच सर्व पदाधिकारी, लातूर जिल्हा सकल जंगम समाज तर्फे सर्व समाज बांधव, पुणे बस ओनर्स, नागपूर, अमरावती,वर्धा,नाशिक, संभाजीनगर, मुंबई, ठाणे, बोरिवली, कोल्हापूर,सोलापूर सर्व जिल्ह्यातील ट्रॅव्हल्स संघटना,पदाधिकारी,भारतीय जनता पार्टी वाहतूक संघटना, मनसे वाहतूक सेना, नॅशनल काँग्रेस पार्टी वाहतूक संघटना अध्यक्ष राम स्वामी बाभळगावकर, लातूर डिझेल पंप असोसिएशन, नर्मदा परिवारतील सर्व कर्मचारी, मॅनेजर, चालक, क्लीनर, तसेच इतर मित्र परिवार यांच्या कडून अभिनंदन करण्यात आले, व त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.





