Ozar News : रामचंद्र अय्यर यांना उत्कृष्ट शैक्षणिक कार्यासाठी सामाजिक समता प्रतिष्ठानचा ‘गौरव पुरस्कार’ प्रदान
उत्कृष्ट शैक्षणिक कार्यासाठी न्यू इंग्लिश स्कूल शिरोली बु॥ चे उपशिक्षक रामचंद्र अय्यर यांना (Ozar News) सोमवार दि ६ रोजी समता प्रतिष्ठानने 'गौरवपत्र' देऊन सन्मानित केले.

Ozar News : उत्कृष्ट शैक्षणिक कार्यासाठी न्यू इंग्लिश स्कूल शिरोली बु॥ चे उपशिक्षक रामचंद्र अय्यर यांना (Ozar News) सोमवार दि ६ रोजी समता प्रतिष्ठानने ‘गौरवपत्र’ देऊन सन्मानित केले.
यावेळी न्यू इंग्लिश स्कूल विद्यालयाचे मुख्याध्यापक प्रसाद हांडे, पर्यवेक्षक गणेश राऊत प्रतिष्ठानचे अध्यक्ष विलास डुंबरे,शोभा कवडे, संतोष देवकुळे विद्यालयातील शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी (Ozar News) उपस्थित होते.
प्रतिष्ठानच्या वतीने सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या सेवाभावी व्यक्तींस हा पुरस्कार दिला जातो. प्रसिद्धिच्या झोतात न येता सातत्यपूर्ण सामाजिक बांधिलकी राखत कार्य करणाऱ्या अनेक समाजनिष्ठांस प्रतिष्ठानने सन्मानित करीत, त्यांच्या कार्याची दखल घेतलेली आहे.
अय्यर यांनी आपल्या शैक्षणिक कारकीर्दीत अनेक गुणी विद्यार्थी घडविले आहेत.संगीत क्षेत्रात त्यांचे विद्यार्थी राज्यस्तरावर चमकले आहेत. विद्यार्थी हिताला प्राधान्य देत विविध उपक्रम, प्रकल्प सातत्याने ते राबवित असतात.
“माझ्याच संस्थेकडून मिळालेला हा पुरस्कार माझ्या आयुष्यातील आनंददायी प्रसंग आहे. प्रतिष्ठानचे कार्य फार मोठे आहे ” असे मनोगत अय्यर यांनी व्यक्त केले. प्रास्ताविक व सुत्रसंचलन तुकाराम निधन यांनी केले तर आभार सुनिल विरणक यांनी (Ozar News) मानले.






