Narendra Modi : मैं ईश्वर की शपथ..! नरेंद्र मोदींनी घेतली तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ

Updated On:

Narendra Modi swearing in ceremony । NDA संसदीय पक्षाचे नेते ‘नरेंद्र मोदी’ यांनी आज (दि. 9) तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतली आहे. शुक्रवारी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी नरेंद्र मोदींना सरकार स्थापनेचे निमंत्रण दिले होते. त्यानंतर आज नरेंद्र मोदींचा शपथविधी पार पडला.

नरेंद्र मोदींनी आज सलग तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतली असून, यावेळी राष्ट्रपती भवनाच्या प्रांगणात मोठ्या संख्येने राजकीय नेते उपस्थित होते.

पंतप्रधान मोदींनी राजघाटावर महात्मा गांधींना श्रद्धांजली अर्पण करून आजच्या दिवसाची सुरुवात केली. माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनाही त्यांनी सदैव अटल येथे आदरांजली वाहिली. त्यानंतर त्यांनी राष्ट्रीय युद्ध स्मारकावर जाऊन पुष्पहार अर्पण केला.

नरेंद्र मोदी यांच्या शपथविधी सोहळ्याला शेजारील देशातील अनेक नेते उपस्थित होते. देशाचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्यानंतर सलग तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेणारे नरेंद्र मोदी हे दुसरे व्यक्ती ठरले आहेत.

आणखी संबंधित बातम्या

Rahul Gandhi: राहुल गांधींचा एक फोन अन् भाजपचा सगळा प्लॅन फिस्कटला; माजी आमदार भावुक होत म्हणाले "या लढाईत मी तुमच्यासोबत राहीन"

2026-09-22 13:45:57

Rahul Gandhi: राहुल गांधींचा एक फोन अन् भाजपचा सगळा प्लॅन फिस्कटला; माजी आमदार भावुक होत म्हणाले "या लढाईत मी तुमच्यासोबत राहीन"

मोठी बातमी: राज्यातील पदवीधर आणि शिक्षक मतदार संघाच्या निवडणूकीची घोषणा

2026-09-22 11:30:15

मोठी बातमी: राज्यातील पदवीधर आणि शिक्षक मतदार संघाच्या निवडणूकीची घोषणा

Kangana Ranaut : 13 कोटींच्या Rolls-Royce मधून मैथिली ठाकूर लालबागच्या दर्शनाला येताच ट्रोल; कंगना रणौतने ट्रोलर्सना दिलं उत्तर, "काही लोकांचा जळफळाट होतो.."

2026-09-21 15:54:00

Kangana Ranaut : 13 कोटींच्या Rolls-Royce मधून मैथिली ठाकूर लालबागच्या दर्शनाला येताच ट्रोल; कंगना रणौतने ट्रोलर्सना दिलं उत्तर, "काही लोकांचा जळफळाट होतो.."

Police Officer Death : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या ताफ्यातील पोलिस अधिकाऱ्याचा मृत्यू

2026-09-21 15:41:56

Police Officer Death : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या ताफ्यातील पोलिस अधिकाऱ्याचा मृत्यू

Rahul Gandhi : ‘छात्रों की गुंज’ नव्हे ‘झूट कि गुंज’; भाजपचा राहुल गांधींवर निशाणा

2026-09-21 15:22:19

Rahul Gandhi : ‘छात्रों की गुंज’ नव्हे ‘झूट कि गुंज’; भाजपचा राहुल गांधींवर निशाणा