Sonia Gandhi : “देशाच्या सर्वांगीण प्रगतीकडे पाहण्यासाठी सोनिया गांधींनी इटालियन चष्मा काढून टाकावा” – भाजप
गेल्या १२ वर्षांत देशाने केलेल्या सर्वांगीण प्रगतीकडे पाहण्यासाठी सोनिया गांधी यांनी आपला इटालियन चष्मा काढून टाकावा, असे प्रत्युत्तर भाजपने दिले आहे.

Sonia Gandhi – सबका साथ, सबका विकास, सबका प्रयास आणि ७.८ टक्के (जीडीपी) विकास दरासह जागतिक महाशक्ती म्हणून भारताचा उदय होत आहे. मात्र, काँग्रेसचा इतिहास अनेक दशकांपासून जात, धर्म आणि व्होट-बँक राजकारणाच्या माध्यमातून देशाला विभागण्याचा राहिला आहे.
गेल्या १२ वर्षांत देशाने केलेल्या सर्वांगीण प्रगतीकडे पाहण्यासाठी सोनिया गांधी यांनी आपला इटालियन चष्मा काढून टाकावा, असे प्रत्युत्तर भाजपने दिले आहे. भाजपचे राज्यसभा खासदार तरुण चुघ म्हणाले, आज संपूर्ण देशातील नागरिकांमध्ये श्रद्धेची एक नवीन लाट निर्माण झाली आहे, पण ती विरोधकांना पचत नाही.
तुम्ही नक्कीच पुस्तक लिहा, पण हेही स्पष्ट करा की बाटला हाऊस चकमकीत जेव्हा एक दहशतवादी मारला गेला, तेव्हा तुमच्या डोळ्यांत पाणी का आले आणि तुम्ही रात्रभर का रडलात? देशाला हे जाणून घ्यायचे आहे की, भारतीय सैनिकांच्या हौतात्म्यावर तुम्ही आजपर्यंत एक शब्दही का उच्चारला नाही?
चुघ यांनी गांधी यांना १९८४ च्या शीखविरोधी दंगलींविषयी लिहिण्यासही सांगितले. तसेच तुमच्या कुटुंबातील कोण व्यक्ती बोफोर्स तोफ खरेदीतील लाच प्रकरणात सामील होती, भोपाळ गॅस दुर्घटनेतील दोषींना पळून जाण्याची संधी का दिली गेली आणि कोणाच्या सांगण्यावरून दिली गेली, याबद्दलही तुम्ही लिहिले पाहिजे.
भारत हा ऋषी, संत, तपस्वी आणि कठोर साधना करणार्यांचा देश आहे आणि तो तसाच राहील. त्या आधी भारतीय मतदार बनल्या की भारतीय नागरिक? देशाला हे जाणून घ्यायचे आहे, अशा शब्दांत निशाणा साधला.






