Murlidhar Mohol : पहिल्याच टर्ममध्ये ‘मुरलीधर मोहोळ’ यांच्या गळ्यात मंत्रिपदाची माळ; मोदी मंत्रिमंडळात वर्णी

Updated On:

Narendra Modi swearing in ceremony । Murlidhar Mohol । NDA संसदीय पक्षाचे नेते नरेंद्र मोदी आज (दि. ९) तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतली आहे. शुक्रवारी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी नरेंद्र मोदींना सरकार स्थापनेचे निमंत्रण दिले होते. त्यानंतर आज नरेंद्र मोदींचा शपथविधी पार पडला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं आगमन झालं असून, यावेळी राष्ट्रपती भवनात जल्लोष पाहायला मिळाला. पंतप्रधान नरेंद्र मोदी, राजनाथ सिंह यांच्यानंतर अमित शाह यांनी शपथ घेतली. तसेच नितीन गडकरीही मोदींच्या मंत्रिमंडळात असून त्यांनी देखील मंत्रिपदाची घेतली शपथ घेतली.

डॉ. एस जयशंकर यांनीही केंद्रीय मंत्रीपदाची शपथ घेतली. जयशंकर यांनी या आधी परराष्ट्र मंत्री म्हणून काम पाहिलं आहे. निर्मला सीतारामण यांना दुसऱ्यांदा मोदींच्या मंत्रिमंडळात मंत्रिपदाची संधी मिळाली आहे. यामध्ये पहिल्यांदाच पुण्याचे खासदार झालेल्या मुरलीधर मोहोळ यांचाही समावेश असून, त्यांनी देखील मंत्रिपदाची शपथ घेतली आहे.

पहिल्याच टर्ममध्ये केंद्रीय मत्रीपदाची लॉटरी-

संपूर्ण राज्याचं लक्ष लागून राहिलेल्या पुणे लोकसभा मतदारसंघात काँग्रेसचे आमदार रविंद्र धंगेकर यांचा पराभव करून मुरलीधर मोहोळ पहिल्यांदाच पुण्यातून खासदार झाले आहेत. राज्यभरात भाजपला अपेक्षित यश मिळालं नसताना मुरलीधर मोहोळ यांनी मात्र पुणे मतदारसंघात विजय मिळवला.

त्यांनंतर आता थेट केंद्रीय मंत्रिमंडळात त्यांची वर्णी लागली आहे. मुरलीधर मोहोळ यांनी काँग्रेसचे रविंद्र धंगेकर यांचा १२३०३८ मतांनी पराभव केला. मुरलीधर मोहोळ यांना ५८४७२८ तर रविंद्र धंगेकर यांना ४६१६९० मतं मिळाली. वंचितकडून निवडणूक लढवणारे वसंत मोरे ३२०१२ मतं मिळवून तिसऱ्या स्थानी राहिले.

कोण आहेत मुरलीधर मोहोळ?

मुरलीधर मोहोळ यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक म्हणून काम केलं. भाजपमध्ये त्यांनी बूथ प्रमुख म्हणून कामाला सुरुवात केली. नंतरच्या काळात भाजप युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष आणि सचिव म्हणूनही त्यांनी काम पाहिलं.

मोहोळ हे गेल्या ३० वर्षांपासून संघटनेत कार्यरत आहेत. पुण्याचे महापौर म्हणून त्यांनी काम केलं. पश्चिम महाराष्ट्रात भाजप पक्ष वाढवण्यासाठी आणि मराठा समाजातील नेत्याला संधी देण्याच्या भूमिकेतून भाजपने मोहोळ यांना केंद्रात घेतलं असल्याचं म्हटलं जात आहे.

आणखी संबंधित बातम्या

Auto Fare Hike: पुणेकरांच्या खिशाला कात्री! १ सप्टेंबरपासून रिक्षा भाडेवाढ; पहिल्या दीड किलोमीटरसाठी आता 'इतके' रुपये

2026-08-08 07:00:57

Auto Fare Hike: पुणेकरांच्या खिशाला कात्री! १ सप्टेंबरपासून रिक्षा भाडेवाढ; पहिल्या दीड किलोमीटरसाठी आता 'इतके' रुपये

Laxmi Road: लक्ष्मी रस्त्यावर आता 'पे अँड पार्क'! महापालिकेच्या निर्णयामुळे पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या बाजारपेठेला फटका?

2026-08-08 06:15:20

Laxmi Road: लक्ष्मी रस्त्यावर आता 'पे अँड पार्क'! महापालिकेच्या निर्णयामुळे पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या बाजारपेठेला फटका?

PMC School: महापालिका शाळांच्या 'खासगीकरणा'ला वेग? आणखी ८ शाळा खाजगी संस्थेला दत्तक

2026-08-08 06:00:18

PMC School: महापालिका शाळांच्या 'खासगीकरणा'ला वेग? आणखी ८ शाळा खाजगी संस्थेला दत्तक

Bhor News: भोर तालुक्यातील मतदारांनो लक्ष द्या! मतदार गणना फॉर्म भरण्यासाठी 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ

2026-08-08 03:15:52

Bhor News: भोर तालुक्यातील मतदारांनो लक्ष द्या! मतदार गणना फॉर्म भरण्यासाठी 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ

Strait of Hormuz : होर्मुझ ६० दिवस खुली ठेवण्यास इराण-ओमान तयार

2026-08-07 22:05:08

Strait of Hormuz : होर्मुझ ६० दिवस खुली ठेवण्यास इराण-ओमान तयार