ऑलिम्पिक संघटनेच्या अध्यक्षपदाचा ‘नरेंद्र बात्रां’ यांनी दिला राजीनामा
Updated On:

नवी दिल्ली – भारतीय ऑलिम्पिक संघटनेचे (आयओए) अध्यक्ष नरेंद्र बात्रा यांनी अखेर आपल्या पदाचा राजीनामा दिला. आंतरराष्ट्रीय हॉकी महासंघाचे अध्यक्ष असताना 2017 साली हॉकी इंडियाच्या (भारतीय हॉकी संघ) निधीतील तब्बल 35 लाख रुपयांच्या गैरव्यवहाराच्या आरोपात सीबीआयने त्यांची चौकशी सुरू केली होती.
हॉकी इंडियाच्या निधीचा वापर बात्रा यांनी वैयक्तिक लाभासाठी केल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला होता व त्यानंतर त्यांची चौकशी सुरू झाली होती. हे 2017 सालचे प्रकरण आहे. आंतरराष्ट्रीय हॉकी महासंघाला जास्तीत जास्त वेळ देता यावा, यासाठी आपण भारतीय ऑलिम्पिक संघटनेच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देत असल्याचे बात्रा यांनी म्हटले आहे. मात्र, सीबीआय चौकशीमुळे त्यांच्यावर पद सोडण्यासाठी दबाव होता, असेही सांगितले जात आहे.





