खळबळजनक ! नंदीग्राम एक्स्प्रेसला लागली भीषण आग
Updated On:

मुंबई : कसारा परिसरात नंदीग्राम एक्स्प्रेसच्या कोचला आग लागल्याची घटना समोर आली आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. या घटनेमुळे प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. सर्व प्रवासी सुखरूप आहेत.
आग लागल्याचं लक्षात येताच नंदीग्राम एक्स्प्रेस कसारा सिग्नल जवळ थांबवण्यात आली. दरम्यान ही आग नेमकी कशामुळे लागली याबाबत माहिती मिळू शकलेली नाहीये.आग अद्याप अटोक्यावर आलेली नाहीये आगीवर नियंत्रण मिळवण्याचं काम सुरू आहे. या ट्रेनमधील सर्व प्रवाशांना खाली उतरवण्यात आलं असून, त्यांना सुरक्षित स्थळी हालवण्यात आलं आहे.
दरम्यान ही आग नेमकी कशामुळे लागली हे अद्याप स्पष्ट होवू शकलेलं नाहीये, आगीची घटना लक्षात आल्यानंतर प्रवाशांमध्ये एकच धावपळ उडाली. प्रवाशांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं.





