धक्कादायक ! नंदीग्राम एक्सप्रेसच्या शौचालयात गळफास लावलेल्या अवस्थेत आढळला मृतदेह

Nandigram Express । माणसाने नेहमीच गजबजलेल्या मुंबईतल्या दादर रेल्वे स्थानकात एक धक्कादायक घटना घडलीय. नंदिग्राम एक्सप्रेस ट्रेनमध्ये गळफास घेतलेल्या अवस्थेत एक मृतदेह सापडला आहे. या घटनेमुळे दादर रेल्वे स्थानकावर एकच खळबळ उडाली. या प्रकरणी पोलिसांकडून आता चौकशी सुरु आहे.
नंदिग्राम एक्सप्रेसच्या शौचालयात 50 वर्षांचा व्यक्ती गळफास लावलेल्या अवस्थेत आढळला आहे. पोलिसांनी याप्रकरणी मृत्यूची नोंद केली आहे. रेल्वे पोलिसांनी मृतदेह खाली काढून रुग्णालयात नेण्यात आला. मृत व्यक्तीने ट्रेनच्या शौचालयात आत्महत्या का केली, याबाबत पोलीस चौकशी करत आहेत.
मृत व्यक्ती घाटकोपरमधील रहिवासी Nandigram Express ।
मृत व्यक्ती मूळचा घाटकोपर परिसरातील रहिवासी होता. काही दिवसांपूर्वी त्याच्यावर छेडछाडीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. तो त्या प्रकरणात फरार होता. या प्रकरणामुळे मानसिक तणावात असलेल्या मृत व्यक्तीने आपले जीवन संपवले असल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे.
मफलरचा केला वापर Nandigram Express ।
आरोपीने नांदिग्राम एक्सप्रेसच्या शौचालयात स्वतःला गळफास लावण्यासाठी त्याच्याकडील मफलरचा वापर केल्याचं समोर आलंय. दादर रेल्वे पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.
हेही वाचा
काळजी घ्या ! राज्यातील ‘या’ जिल्ह्यात पावसाचा यलो अलर्ट जारी





