Nanded Crime News : नांदेडमध्ये एलसीबीची मोठी कारवाई; ४ गावठी पिस्तूल, १३ जिवंत काडतुसांसह १.९१ लाखांचा मुद्देमाल जप्त
Nanded Crime News : नांदेडमधील नाळेश्वर-सुगाव रस्त्यावर स्थानिक गुन्हे शाखेने सापळा रचून ४ गावठी पिस्तूल आणि १३ जिवंत काडतुसांसह एकास ताब्यात घेतले.

Nanded Crime News : स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने नाळेश्वर – सुगाव जाणा-या रस्त्यावर सापळा रचून ४ गावठी पिस्तुले व १३ जिवंत काडतुसे असा एकूण १ लाख ९१ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी लिंबगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Nanded Crime News)
स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला गोपनीय बातमीदारामार्फत तीन इसम दुचाकीवर अवैध अग्निशस्त्रे घेऊन येत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार वाघी शिवारातील नाळेश्वर – सुगाव रस्त्यावरील बालाजी हिलालपुरे यांच्या आखाड्यासमोर पोलिसांनी सापळा रचला. (Nanded Crime News)
यावेळी एका दुचाकीवरून आलेल्यांची पोलिसांनी तपासणी केली. तसेच पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या संशयितांची चौकशी केली असता अंगझडतीत केली असता आरोपींच्या ताब्यातून ४ गावठी पिस्तुले (किंमत १ लाख २० हजार रुपये), १३ जिवंत काडतुसे ( २६ हजार रुपये) तसेच दुचाकी असा एकूण १ लाख ९१ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. आरोपींकडे या अग्निशस्त्रांचा परवाना नसल्याचे पोलिसांच्या चौकशीत निष्पन्न झाले. (Nanded Crime News)
पोलिसांच्या प्राथमिक चौकशीत सदर गावठी पिस्तुले व जिवंत काडतुसे मध्य प्रदेशातील खंडवा जिल्ह्यातील टेंबुर्णी येथील छोटू सिंग नामक व्यक्तीकडून नांदेड येथे विक्री करण्यासाठी आणल्याचे आरोपींनी सांगितले. त्यामुळे अवैध शस्त्रपुरवठ्याच्या साखळीचा पुढील तपास सुरू असून पुरवठा करणारे तसेच खरेदी-विक्रीत सहभागी असलेल्या अन्य व्यक्तींचा शोध घेतला जात आहे. (Nanded Crime News)
Pune Crime : शेतात डांबून ठेवत तरुणाला अमानुष मारहाण; मोबदला न देता ऊसतोडणी करून घेतली





