Tukaram Mundhe: ‘एक दिवसाचे मुख्यमंत्री झाला तर काय कराल?’ तुकाराम मुंढेंनी दिलं परखड उत्तर…
Tukaram Mundhe : 'जो गोल आणि जो रोल असेल, ते काम झालं पाहिजे'

Tukaram Mundhe: अन्नामध्ये भेसळ करणाऱ्या माफियांची झोप उडवणारे महाराष्ट्र राज्याचे अन्न आणि औषध प्रशासन (FDA) आयुक्त तुकाराम मुंढे यांनी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये कारवाईचा धडाका लावला आहे.
राज्यभरात प्रतिबंधित गुटखा आणि पान मसालाविरोधात अन्न व औषध प्रशासनाने धडक मोहीम राबवत आहे. तसेच हॉटेल, रेस्टॉरंटसह भेसळयुक्त दूध विकाणाऱ्यांना देखील तुकाराम मुंढेंनी नियम कडक करत इशारा दिला आहे. (Tukaram Mundhe)
तुकाराम मुंढे याांच्या या धडाकेबाज कामगिरीमुळे त्यांना अभिनेत्रा अनिल कपूर यांच्या नायक सिनेमाची उपमा दिली जात आहे. याबाबत एका मराठी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत तुकाराम मुंडे यांना जर तुम्हाला नायक सिनेमासारखं ‘एक दिन का सीएम’ बनवलं तर काय कराल? असा प्रश्न विचारण्यात आला. यावर त्यांनी परखडपणे उत्तर दिले. (Tukaram Mundhe)
तुकाराम मुंडे म्हणाले, “लोकशाहीमध्ये असे अमर अधिकार कुणाला नसतात. शासकीय कर्मचारी म्हणून मी नेहमी सांगत असतो. आपलं काम हे शासकीय कर्मचारी म्हणून समाजाला वरच्या स्तराला नेण्याचं आहे. मार्गदर्शन करणे, ताकद देणे आहे, समाज जेवढा विकसित होईल, तेवढा आपला देश आणि व्यक्ती विकसित होतील,” असं तुकाराम मुंढे म्हणाले. Tukaram Mundhe
कोणत्याही क्षेत्रात रोल दिला तर… (Tukaram Mundhe)
पुढे ते म्हणाले, “मला कोणत्याही क्षेत्रात रोल दिला तर ते प्रत्येक दिवशी आणि पुढचा एक इंच कसा वाढेल, हे करताना पूर्णपणे पारदर्शक असेल. जो गोल आणि जो रोल असेल, ते काम झालं पाहिजे. मी शासकीय नोकर आहे, मला माझ्या मर्यादा माहीत आहे. लोक मला नायक म्हणत असले तरी मी त्यांचे आभार मानतो, ते मी चांगल्या हेतूने स्वीकार करतो, ” असेही तुकाराम मुंढे यांनी सांगितले. Tukaram Mundhe
हेही वाचा:






