अजित पवार भाजपसोबत जाणार? नाना पटोले म्हणाले… | Nana Ptole on Ajit Pawar

Nana Ptole on Ajit Pawar – अंजली दमानिया यांनी केलेल्या एका ट्विटमुळे सध्या राज्याच्या राजकीय वर्तुळात उलट सुलट चर्चांना सुरुवात झाली आहे. अजित पवार लवकरच भाजपसोबत जाणार असल्याचा दावा करत अंजली दमानिया यांनी खळबळ उडवून दिली आहे. अजित पवार खरंच भाजपसोबत जाणार का? हा प्रश्न सध्या सर्वत्र चर्चिला जात असून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व मित्रपक्षातील नेत्यांकडून देखील याबाबत प्रतिक्रिया देण्यात येत आहेत. अशातच आता याबाबत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे.
काय म्हणाले नाना पटोले? | Nana Ptole on Ajit Pawar
“अंजली दमानियांनी जे ट्वीट केलं आहे. ते त्यांचं वैयक्तिक मत असेल. मी त्याबाबत जास्त बोलणं योग्य ठरणार नाही. मात्र, माझं मत विचारायचं झाल्यास अजित पवार असं काही करतील किंबहूना ते भाजपाबरोबर जातील असं वाटत नाही” असं मत नाना पटोले यांनी व्यक्त केलं आहे.
सोमय्यांनी आरोप लावलेल्या ‘त्या’ प्रकरणात EDची अजित पवारांना ‘क्लीनचिट’? । Ajit Pawar ED clean cheat
एकटे अजित पवार की संपूर्ण राष्ट्रवादीचं भाजपसोबत?
दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, खासदार सुप्रिया सुळे व विरोधीपक्ष नेते अजित पवार यांनी मांडलेल्या भूमिका भाजपला पूरक ठरणाऱ्या असल्याने राष्ट्रवादी काँग्रेस भाजपसोबत जाणार का ही चर्चा सुरूच होती. अशातच अंजली दमानिया यांनी अजित पवार यांच्याबाबत दावा केल्याने एकटे अजित पवार की संपूर्ण राष्ट्रवादीचं भाजपसोबत जाणार असाही प्रश्न निर्माण झाला आहे.
सुप्रिया सुळे काय म्हणाल्या? | अजित पवार भाजपसोबत जाणार? प्रश्नावर सुप्रिया सुळेंचं कोड्यात उत्तर…
अंजली दमानियांनी केलेल्या दाव्यानुसार अजित पवार खरंच भाजपाबरोबर जाणार आहेत का? या प्रश्नावर सुप्रिया सुळेंनी, “१५ मिनिटांनी इथे मुळशीत पाऊस पडेल का? याचं उत्तर माझ्याकडे नाहीये. आत्ता उन आहे हे मी सांगू शकते. पण १५ मिनिटांनी पाऊस पडेल की नाही याचं उत्तर माझ्याकडे नाही”, असं कोड्यात टाकणार उत्तर दिलं.





