विधानसभेआधीच मुख्यमंत्रिपदावरुन काँग्रेस-ठाकरे गटात जुंपली

भंडारा : विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर महाविकास आघाडीतील धुसफूस आता समोर येऊ लागली आहे. महाविकास आघाडीत मुख्यमंत्री पदाचा वाद वाढणार आहे. त्यामुळे काँग्रेसला मान्य नसेल तर जाहीर करावं, असं वक्तव्य विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केलं आहे. यावर मी लहान माणसांसोबत बोलत नाही, असा पलटवार काँग्रेस नेते नाना पटोले यांच्याकडून करण्यात आला आहे.
काय घडले नेमके?
महाविकास आघाडीत मुख्यमंत्री पदाचा वाद वाढणार आहे. त्यामुळे काँग्रेसला मान्य नसेल तर जाहिर करावं असं वक्तव्य अंबादास दानवे यांनी केलं आहे. तर यावर उत्तर देताना नाना पटोले यांनी सांगितले की मी लहान माणसासोबत बोलत नाही. काल आम्ही उद्धव ठाकरे, शरद पवार साहेब यांच्यासोबत चर्चा केली आहे.
त्यामुळे आता विधानसभेआधी महाविकास आघाडी मुख्यमंत्रीपदाचा तिढा सोडवण्यात यशस्वी होते का? हे पाहणे महत्वाचे असणार आहे. तसेच महाविकास आघाडीकडून मुख्यमंत्री पदाचा उमेदवार कोण असेल याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.





