“महाराष्ट्रामध्ये काँग्रेस पक्षाची 288 जागेवर लढण्याची तयारी सुरु” ; नाना पटोलेंच्या वक्तव्याने एकच खळबळ

Nana Patole on Vidhansabha Election । लोकसभा निवडणुका संपल्यानंतर आता सर्वच राजकीय पक्षांना वेध लागले आहेत ते विधानसभेच्या निवडणुकांचे. येत्या काही महिन्यांमध्ये राज्यात विधानसभा निवडणूक पार पडणार आहेत. त्याच पार्श्वभूमीर सर्वच राजकीय नेतेमंडळी वक्तव्य करताना दिसून येत आहेत. त्यातच काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंच्या एका वक्तव्याने राज्याचे वातावरण ढवळून निघाले आहे. महाराष्ट्रामध्ये काँग्रेस पक्षाची 288 जागेवर लढण्याची तयारी सुरु झाली असल्याचं सूचक वक्तव्य नाना पटोले यांनी केलं आहे.
288 जागांवर काँग्रेसची विधानसभेची तयारी सुरु Nana Patole on Vidhansabha Election ।
राज्यातील विधानसभा निवडणुकीविषयी नाना पटोलेंनी भाष्य करताना,”महाराष्ट्रात आम्ही सगळीकडं विधानसभेची तयारी चालू केली असल्याचे नाना पटोले म्हणाले. मी साकोलीचा आमदार आहे. त्यामुळं स्वाभाविक आहे, मला इथं यावं लागतं. इथल्या लोकांचे प्रश्न समजावून घ्यावे लागतात. ते प्रश्न सोडवावे लागतात. पण, महाराष्ट्रामध्ये 288 जागांवर काँग्रेसची विधानसभेची तयारी सुरु झाली असल्याचे म्हटले आहे.
दरम्यान, नाना पटोलेंच्या या वक्तव्याची सध्या राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरु आहे. कारण, लोकसभेच्या निवडणुकीप्रमाणे विधानसभेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीची एकजुट दिसणार का? असा सवाल या निमित्ताने उपस्थित केला जातोय.
नाना पटोलेंचा बैठकांचा सपाटा सुरु Nana Patole on Vidhansabha Election ।
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा मतदारसंघ असलेल्या साकोली विधानसभेत त्यांनी जिल्हा परिषद निहाय कार्यकर्ता आणि पदाधिकाऱ्यांच्या बैठकांचा सपाटा सुरु केला आहे. दरम्यान, गावात पोहोचल्यानंतर नागरिकांच्याही समस्या नाना पटोलेंनी अगदी आत्मीयतेनं जाणून घेतल्या आहेत. नाना पटोले यांनी विधानसभा पिंजून काढण्याचा सपाटा लावला आहे. याबाबत त्यांना विचारलं असता त्यांनी साकोलीचं नव्हे तर, महाराष्ट्रातील 288 जागांची विधानसभेची तयारी काँग्रेस करत असल्याचं वक्तव्य केलं.





