पुणे | मंडई मेट्रो स्टेशनला महात्मा फुलेंचे नाव द्या

पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – स्वारगेट ते शिवाजीनगर भुयारी मेट्रो मार्गाच्या उद्घाटनाची लगबग सुरू आहे. तर, दुसऱ्या बाजूला मंडई स्थानकाच्या नावाचा वाद वाढला आहे. महामेट्रोने तत्काळ “मंडई स्टेशन’ हे नाव बदलून मेट्रो स्टेशनला “महात्मा फुले मंडई’ असे नाव देण्यात यावे, अशी मागणी माळी महासंघाने केली आहे.
या मागणीसाठी महासंघाच्या वतीने या मेट्रो स्थानकाच्या बाहेर आंदोलनही केले आहे. महात्मा फुले मंडई येथील मेट्रो स्टेशनला केवळ “मंडई मेट्रो स्टेशन’ असे नाव देण्यात आले आहे.
त्यावरून सामाजिक संस्था आणि राजकीय पक्ष आक्रमक झाले असून उद्घाटनापूर्वी नाव बदलण्याची मागणी केली जात आहे.
मात्र, मेट्रो प्रशासनाकडून प्रतिसाद मिळत नसल्याने महासंघाकडून आक्रमक पवित्रा घेत आंदोलन करण्यात आले.
माळी महासंघाचे शहर अध्यक्ष दीपक जगताप, मृणाल ढोले पाटील, स्मिता लडकत, बाळासाहेब लडकत, रवि सहाणे, हरिष लडकत, सतीश गायकवाड, मधुकर राऊत, सुधीर पैठणकर, सचिन शिवरकर, सोमनाथ बटवाल, हरिश जाधव, बबलू बोंधे, राकेश नामेकर, शारदा लडकत, प्रीती म्हेत्रे, गौरी पिंगळे, शांता नेवसे, वंदना बनकर आदी पदाधिकारी उपस्थित होते.





