धक्कादायक ! नागपूरमध्ये पाण्याचा अंदाज न आल्याने 4 जण बुडाले

नागपूर : नागपूरमधील रामटेकमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. रामटेक तालुक्यात बोरी गावाजवळ चार शाळकरी मुलं कालव्यात बुडाल्याचे समोर आले आहे. बोरी गावाजवळ इंदिरा शाळा व कनिष्ठ महाविद्यालयातील आठ विद्यार्थी आज दुपारी शाळेजवळच्या कालव्यावर पोहायला गेले होते. यादरम्यान ही घटना घडली.
काय आहे संपूर्ण प्रकरण?
बोरी गावाजवळ इंदिरा शाळा व कनिष्ठ महाविद्यालयातील आठ विद्यार्थी शाळेजवळच्या कालव्यावर पोहायला गेले होते. आठ पैकी चार मुलं पाण्यात उतरले. मात्र तेव्हा कालव्यामध्ये पाण्याचा प्रवाह तीव्र असल्यामुळे ते स्वतःला सावरू शकले नाहीत आणि ते प्रवाहासोबत वाहून गेले.
या घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि स्थानिक प्रशासन घटनास्थळी पोहोचले असून चारही मुलांचा शोध कार्य सुरू आहे. मात्र अद्याप एकाही विद्यार्थ्याला शोधण्यात यश आले नाही. कालव्यात बुडालेले सर्व विद्यार्थी सातव्या त्या अकराव्या वर्गा दरम्यानचे आहेत.





