Nagpur News : नागपुरमधील एमआयडीसीत स्फोट; 3 जण जखमी
नागपूर (Nagpur News) जिल्ह्यातील कळमेश्वर एमआयडीसीतील केमफिल्ड कंपनीत स्टीम बॉयलरचा मोठा स्फोट झाला आहे. ही घटना शनिवारी रात्री साडेनऊच्या सुमारास घडल्याची माहिती आहे.
Updated On:

Nagpur News : नागपूर (Nagpur News) जिल्ह्यातील कळमेश्वर एमआयडीसीतील केमफिल्ड कंपनीत स्टीम बॉयलरचा मोठा स्फोट झाला आहे. ही घटना शनिवारी रात्री साडेनऊच्या सुमारास घडल्याची माहिती आहे. या स्फोटात तीन कामगार किरकोळ जखमी झाले असून, सुदैवाने मोठी दुर्घटना टळली आहे.
नीरज यादव, रवी निषाद आणि जून बंदसिंग यांचा जखमींमध्ये समावेश आहे. सध्या जखमींना खासगी रुग्णालयात दाखल करत प्राथमिक उपचारानंतर सोडण्यात आल्याची माहिती आहे. स्फोटाच्या तीव्रतेने कंपनीच्या भिंतीचा काही भाग कोसळला (Nagpur News)आहे.
तापमानातील अचानक चढ-उतारामुळे स्फोट झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. दरम्यान घटनेची माहिती मिळताच कळमेश्वर पोलिसांकडून घटनास्थळाची पाहणी करत स्फोटाचे नेमके कारण शोधण्यासंदर्भात तपास (Nagpur News) सुरू केला आहे.






