Nagpur Hit And Run । नागपुरात गेल्या 48 तासात झालेल्या वेगवेगळ्या अपघातात एकूण 6 नगरिकांचा ‘मृत्यू’

Nagpur Hit And Run । राज्यात गेल्या काही दिवसात हिट अँड रनच्या घटनांचे प्रमाण वाढले आहे. पुण्यातील पोर्शे कार प्रकरण ताजे असतांनाच नुकतेच मुंबईतील वरळी भागात हिट अँड रनची घटना घडली. अशात आता नागपूरमध्येही एकाचवेळी दोन वेगवेगळ्या भागात हिट अँड रनची घटना घडल्याची माहिती समोर येत आहे.
मिळलेल्या माहितीनुसार, नागपुरातील कपिलनगर पोलीस ठाण्याच्या परिसरात एक तरुण दुचाकीनं जात असताना ट्रकनं धडक दिल्यानं त्याचा मृत्यू झाला आहे. या दरम्यान ट्रक चालक पळून गेला आहे. अपघातात भावेश भरणे या तरुणाचा जागीच मृत्यू झाला आहे.
तर शहरातील वाठोडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतही त्याच दिवशी हिट अँड रनची घटना घडल्याची माहिती समोर येत आहे. प्रकाश महंत हा भांडेवाडी परिसरातून तरुण चालत जात असताना अज्ञात वाहनानं त्याला धडक दिली त्यात त्याचा मृत्यू झाला. एकाच दिवसात शहरात हिट अँड रनची घटना घडल्यामुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. गेल्या 48 तासांत झालेल्या वेगवेगळ्या अपघातात एकूण 6 नगरिकांचा मृत्यू झाला आहे. ज्यात मृत्यू झालेले पाचजण हे 30 वयोगटाच्या खालचे आहेत.
नागपूर शहरात गेल्या काही दिवसात हिट अँड रनच्या घटना वाढत असल्यामुळे स्थानिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या घटनेतील आरोपींचा शोध पोलिसांकडून करण्यात येत आहे. पोलिसांनी घटनास्थळी जात या अपघाताचा तपास सुरु केला आहे.





