School Closed : नागपुरातील १८ नामांकित शाळांना अचानक सुट्टी; धक्कादायक कारण समोर, पालकांमध्ये भीतीचे वातावरण
School Closed : नागपूर शहरातील सुमारे १८ नामांकित शाळांना एकाच वेळी बॉम्बने उडवून देण्याचा धमकीचा ई-मेल प्राप्त झाल्याने नागपुरात मोठी खळबळ उडाली आहे.

School Closed : नागपूर शहरातील 18 नामांकित शाळांना बॉम्बने उडवून देण्याची धमकी देणारा ई-मेल प्राप्त झाल्यानंतर शहरात खळबळ उडाली. या धमकीच्या ई-मेलमध्ये 31 ऑगस्टचा स्पष्ट उल्लेख करण्यात आला होता. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून काही शाळांनी सोमवारी सुट्टी दिली, तर काही शाळांनी ऑनलाइन वर्ग घेतले. (School Closed)
मिळालेल्या माहितीनुसार, नागपूरमधील 12 हून अधिक शाळांना असे ई-मेल मिळाले होते. त्यानंतरच्या तपासात शहरातील 18 शाळांना आणि इतर काही महत्त्वाच्या ठिकाणांना धमकी देण्यात आल्याचे समोर आले. त्यामुळे ई-मेल मिळताच शाळा प्रशासनाने पोलिसांना माहिती दिली आणि तातडीने सुरक्षा यंत्रणा सक्रिय करण्यात आली. (School Closed)
धमकीची माहिती मिळताच नागपूर पोलिसांनी संबंधित शाळांमध्ये बॉम्ब शोधक व नाशक पथक आणि श्वान पथक पाठवले. शाळेच्या इमारती, वर्गखोल्या, कार्यालये, परिसर तसेच ये-जा करण्याच्या ठिकाणांची तपासणी करण्यात आली. (School Closed)
मात्र तपासणीदरम्यान कोणतीही संशयास्पद वस्तू किंवा स्फोटक आढळले नाही. पोलिसांनी प्राथमिक तपासानंतर धमकीला बनावट किंवा अफवा पसरविण्याचा प्रयत्न मानले आहे. (School Closed)






