Cricketer Aditi Suicide : “दादा, तू मोठा खेळाडू बन…”; क्रिकेट संघात निवड न झाल्याने १७ वर्षीय क्रिकेटपटूची आत्महत्या!
Cricketer Aditi Suicide : मोठ्या स्तरावरील क्रिकेट संघात निवड न झाल्यामुळे नैराश्यातून १७ वर्षीय तरुणीने कथितरित्या आत्महत्या केली आहे. गुरुवारी सकाळी बजाज नगर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील लक्ष्मी नगर भागात ही थरारक घटना उघडकीस आली.

17 Year Old Cricketer Aditi Chokhande Commits Suicide Selection Rejection Suicide Note : क्रीडा विश्वाला हादरवून टाकणारी एक अत्यंत दुर्दैवी आणि धक्कादायक घटना नागपूरमध्ये समोर आली आहे. मोठ्या स्तरावरील क्रिकेट संघात निवड न झाल्यामुळे नैराश्यातून १७ वर्षीय तरुणीने कथितरित्या आत्महत्या केली आहे. गुरुवारी सकाळी बजाज नगर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील लक्ष्मी नगर भागात ही थरारक घटना उघडकीस आली. अदिती चौखंडे (Aditi Chokhande) असे या दुर्दैवी क्रिकेटपटूचे नाव आहे.
क्रिकेटर बनण्याचे होते स्वप्न!
अदिती ही मूळची अकोला जिल्ह्यातील रहिवासी होती. क्रिकेटमधील करिअरसाठी ती आपली आई आणि मोठ्या भावासोबत नागपूरमध्ये राहत होती. तिचे वडील अकोल्यात सिव्हिल कॉन्ट्रॅक्टर म्हणून काम करतात. अदितीने नुकतीच १२ वीची परीक्षा उत्तीर्ण केली होती. पोलिसांच्या माहितीनुसार, अदिती तिचा मोठा भाऊ प्रबलसोबत क्रिकेटपटू बनण्याचे व्यावसायिक प्रशिक्षण घेत होती. प्रबल हा देखील एक उगवता क्रिकेटपटू आहे. बुधवारी रात्री आईसोबत जेवण केल्यानंतर अदिती तिच्या खोलीत गेली आणि तिथे तिने हे टोकाचे पाऊल उचलले. घटनेच्या वेळी तिचा भाऊ शहराबाहेर होता.
भावुक सुसाईड नोट जप्त –
A 17-year-old woman #cricketer allegedly died by suicide in #Maharashtra‘s #Nagpur after reportedly being disappointed over not being selected for the Vidarbha Cricket Association (#VCA) team. Aditi Choukande, originally from Akola, had been living with her mother in Nagpur for… pic.twitter.com/qlisBe01Fl
— News9 (@News9Tweets) July 31, 2026
पोलिसांना अदितीच्या खोलीतून एक सुसाईड नोट (Suicide Note) सापडली आहे. या चिठ्ठीत तिने संघात निवड न झाल्यामुळे आलेली तीव्र निराशा व्यक्त केली आहे. तिने आपल्या भावाला उद्देशून लिहिले, “दादा, तू खूप छान खेळतोस. तू खूप मोठा खेळाडू बनशील. आई-वडिलांचे नाव रोशन कर. मला खूप वाईट वाटत आहे की माझे सिलेक्शन होऊ शकले नाही.” आपल्याला आपल्या पालकांचा अभिमान बनायचे होते, अशी इच्छाही तिने यात व्यक्त केली.
बजाज नगर पोलीस ठाण्याचे सीनियर इन्स्पेक्टर चेतन चव्हाण यांनी सांगितले की, प्राथमिक तपासानुसार अदिती एका मोठ्या पातळीवरील क्रिकेट संघात निवड न झाल्यामुळे प्रचंड मानसिक दबावात होती. पोलिसांनी सध्या या प्रकरणी आकस्मिक मृत्यूची (Accidental Death) नोंद केली असून पुढील तपास सुरू केला आहे.





