Nagarkar Jewellers : नगरकर ज्वेलर्सच्या लकी ड्रॉमध्ये तिघांचे नशीब चमकले; कार, इलेक्ट्रिक दुचाकी अन् आयफोन जिंकले!
Nagarkar Jewellers : नगरकर ज्वेलर्सच्या लकी ड्रॉमध्ये डॉ. अर्चना पवार यांनी इलेक्ट्रिक कार, डॉ. आसावरी कानडे यांनी इलेक्ट्रिक दुचाकी, तर सोनाली बागडे यांनी आयफोन १७ जिंकला.

Nagarkar Jewellers : नगरकर ज्वेलर्सच्या पहिल्याच लकी ड्रॉला ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. या ड्रॉमध्ये डॉ. अर्चना पवार यांनी टाटा टियागो इलेक्ट्रिक कार, डॉ. आसावरी कानडे यांनी इलेक्ट्रिक अॅक्टिव्हा दुचाकी, तर सोनाली बागडे यांनी आयफोन १७ जिंकला. रविवारी (१५ नोव्हेंबर) बाणेर येथील नगरकर ज्वेलर्सच्या दालनात या लकी ड्रॉचा निकाल जाहीर करण्यात आला.
नगरकर ज्वेलर्सच्या तुळशीबाग, लक्ष्मी रोड, कोथरूड, ठाणे आणि बाणेर येथील पाच दालनांमध्ये हा उपक्रम राबवण्यात आला होता. २४ ऑक्टोबर ते १५ नोव्हेंबर या कालावधीत खरेदी करून कूपन भरलेल्या ग्राहकांना लकी ड्रॉमध्ये सहभागी होता आले. बाणेर येथील दालनात पारदर्शक पद्धतीने विजेत्यांची निवड करण्यात आल्याचे आयोजकांनी सांगितले.
या लकी ड्रॉमध्ये पहिले बक्षीस असलेली टाटा टियागो इलेक्ट्रिक कार ठाणे दालनातून खरेदी करणाऱ्या डॉ. अर्चना पवार यांना मिळाली. दुसरे बक्षीस इलेक्ट्रिक अॅक्टिव्हा दुचाकी कोथरूड दालनातील ग्राहक डॉ. आसावरी कानडे यांनी जिंकली. तर तिसरे बक्षीस असलेला आयफोन १७ बाणेर दालनातून खरेदी करणाऱ्या सोनाली बागडे यांना मिळाला. निकाल जाहीर झाल्यानंतर विजेत्यांना फोन करून माहिती देण्यात आली.
यावेळी नगरकर ज्वेलर्सचे संचालक वसंत नगरकर, स्वाती वल्लभ नगरकर, वासंती वसंत नगरकर, प्रसाद नगरकर, पुष्कर नगरकर, पूजा नगरकर कुलकर्णी आणि रोहन कुलकर्णी उपस्थित होते.
या उपक्रमाबाबत पुष्कर नगरकर म्हणाले, की लकी ड्रॉचे हे पहिलेच वर्ष असूनही ग्राहकांनी चांगला प्रतिसाद दिला. दसरा आणि दिवाळीच्या काळात सोन्याच्या दरात झालेल्या घसरणीमुळे खरेदीला चालना मिळाली. या काळात ग्राहकांनी सोने, सोन्याचे दागिने आणि चांदीची खरेदी केली. सणासुदीबरोबरच लग्नसराईमुळेही खरेदी वाढली. वाढते प्रदूषण आणि इंधनाचा खर्च लक्षात घेऊन बक्षिसांमध्ये इलेक्ट्रिक वाहनांचा समावेश करण्यात आला. याशिवाय ठरावीक रकमेची खरेदी करणाऱ्या ग्राहकांसाठी ‘स्पिन टू विन’ ही ऑफरही होती. यात घड्याळ, डिनर सेट आणि पाण्याच्या बाटल्यांसारखी बक्षिसे देण्यात आली.
प्रसाद नगरकर यांनी सांगितले, की बाणेर येथील दालन दोन महिन्यांपूर्वी सुरू झाले. या दालनाला ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. येथे ‘राजवाडा कलेक्शन’ हे विशेष आकर्षण आहे. ग्राहकांच्या पसंतीनुसार दागिने तयार करून दिले जातात. या कलेक्शनमधील प्रत्येक डिझाइन एकदाच तयार केले जाते. त्यामुळे ग्राहकांना वेगळ्या प्रकारचे दागिने खरेदी करण्याची संधी मिळते. भविष्यात राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये व्यवसायाचा विस्तार करण्याची योजनाही आहे.
दरम्यान, व्यवसायाच्या वाढीमध्ये विठ्ठलाची कृपा आणि मुलांनी घेतलेले कष्ट महत्त्वाचे असल्याची भावना स्वाती आणि वासंती नगरकर यांनी व्यक्त केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन लीना गोखले यांनी केले. यावेळी नगरकर ज्वेलर्सच्या सर्व दालनांचे व्यवस्थापक उपस्थित होते.





