नगर : जिरेवाडी येथील मंदिरातील दानपेटी फोडली
Updated On:

पाथर्डी – तालुक्यातील जिरेवाडी येथील मंदिरातील दानपेटी फोडून त्यातील रक्कम चोरट्याने चोरी केल्याची घटना घडली. याप्रकरणी पाथर्डी पोलीसात गुन्हा दाखल केला असून गावातील तरुणाला अटक करण्यात आली आहे.
जिरेवाडी गावात वामनभाऊ, भगवानबाबा, विठ्ठल रखमाई असे एकत्र मंदिर आहे. दि. 3 नोव्हेंबर रोजी पहाटे चार वाजता काकड आरती करण्यासाठी भजनी मंडळ गेले. त्यावेळी दानपेटीचे कडीकोंडा निघालेला होता. दानपेटीचे कुलुप तोडुन पेटील जमा झालेली देणगी रक्कम ही चोरुन नेली.
या प्रकरणी मुकुंद आंधळे यांच्या तक्रारीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या मंदिरात गेल्या काही महिन्यांपूर्वी चोरी झाली होती. या चोरीप्रकरणी पांडुरंग आंधळे या तरुणाला पोलिसांनी अटक केली





