Nagar : ३६ लाभार्थ्यांना ७१ लाखांचे अनुदान मंजूर – खासदार नीलेश लंके
Updated On:

पारनेर : गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजनेअंतर्गत पारनेर तालुक्यातील रस्ते अपघातात, विजेच्या धक्क्याने, पाण्यात बुडून मृत्यू पावलेल्या तसेच वन्य प्राण्यांच्या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या अथवा जखमी झालेल्या ३६ शेतकऱ्यांना सानुग्रह अनुदान मंजूर झाले आहे.
या ३६ शेतकऱ्यांच्या वारसांच्या बॅंक खात्यावर तब्बल ७१ लाख रुपयांचे अनुदान वर्ग करण्यात येणार असल्याचे खासदार नीलेश लंके यांनी सांगितले.





