नगर – एटीएमची आदलाबदल करून ५० हजारांना फसविण्यात आले. शहरातील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या मुख्य शाखेतील एटीएममध्ये ही घटना घडली. महिलेने दिलेल्या फिर्यादीवरून भिंगार कॅम्प पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वैशाली अशोक सावंत (वय ४२, रा. दिपनगर, भिंगार) या गुरूवारी (दि.२९) सकाळी साडे अकरा वाजता स्टेट बँक ऑफ इंडिया मुख्य शाखेत गेल्या होत्या. त्यावेळेस अंगात पिवळ्या रंगाचा टी-शर्ट घातलेला, डोळ्यास काळा चष्मा घातलेला, तोंडास निळसर रंगाचा मास्क लावलेला तरूण तेथे आला. त्याने एटीएमचा पिन जनरेट करुन देतो, असा विश्वास संपादन करून एटीएम घेतले. लक्ष विचलीत करुन हातचलाखीने एटीएम कार्ड बदले. वेगवेगळ्या ए.टी.एम मशिन मधून वेळोवेळी ५० हजार रूपये काढून फसवणूक केली. सावंत यांनी दिलेल्या फिर्यादीवरून भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात तरूणाविरद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.