ATM New Rules: नव्या आर्थिक वर्षाच्या सुरुवातीपासून म्हणजेच १ एप्रिल २०२६ पासून देशभरातील ATM वापराचे अनेक नियम बदलणार आहेत. बँकांनी केलेल्या या बदलांचा थेट परिणाम ग्राहकांच्या रोख रक्कम काढण्यावर आणि व्यवहारांवर होणार आहे. सर्वात महत्त्वाचा बदल म्हणजे UPI द्वारे केलेली कॅश विड्रॉल (एटीएम) आता मोफत व्यवहारांच्या मर्यादेत गणली जाणार आहे. HDFC बँकेचे नवे नियम – ATM New Rules HDFC बँकेने जाहीर केले आहे की १ एप्रिलपासून ATM वर UPI द्वारे केलेली कॅश विड्रॉल मासिक मोफत व्यवहार मर्यादेत समाविष्ट केली जाईल. यापूर्वी ही विड्रॉल वेगळ्या श्रेणीत मोजली जात होती. बँकेच्या नियमांनुसार बचत आणि पगार खातेधारकांना HDFC च्या स्वतःच्या ATM वर दरमहा ५ मोफत व्यवहार मिळतात. इतर बँकांच्या ATM वर मेट्रो शहरांत ३ तर बिगर मेट्रो शहरांत ५ मोफत व्यवहार मिळतात. मोफत मर्यादा संपल्यानंतर प्रत्येक व्यवहारावर २३ रुपये शुल्क आकारले जाईल, त्यावर स्वतंत्रपणे कर लागू होईल. PNB ने निकासी मर्यादा घटवली – ATM New Rules ATM New Rules: 1 एप्रिलपासून ATM नियम बदलणार! पंजाब नॅशनल बँकेने काही डेबिट कार्डांसाठी दैनंदिन निकासी मर्यादेत बदल केला आहे. १ एप्रिलपासून ही नवी मर्यादा लागू होईल. त्यानुसार अनेक कार्डांसाठी दैनंदिन निकासी मर्यादा १ लाख रुपयांवरून ५० हजार रुपयांवर आणण्यात आली आहे. प्रीमियम कार्डांसाठी ही मर्यादा १.५ लाख रुपयांवरून ७५ हजार रुपयांवर आणली आहे. याचा अर्थ मोठी रक्कम काढायची असल्यास ग्राहकांना अनेक दिवसांत टप्प्याटप्प्याने पैसे काढावे लागतील किंवा बँक शाखा अथवा डिजिटल पेमेंटचा पर्याय वापरावा लागेल. बँकेने ग्राहकांना आपल्या कार्डाची नवी मर्यादा तपासून घेण्याचा सल्ला दिला आहे. हेही वाचा – सोनं 10 तर चांदी 20 हजारांनी कोसळली; जाणून घ्या 5 प्रमुख कारणे बंधन बँकेचे नवे नियम – बंधन बँकेनेही ATM वापरासंबंधीच्या नियमांत बदल केले आहेत. बँकेच्या स्वतःच्या ATM वर दरमहा ५ मोफत आर्थिक व्यवहार मिळतील. बॅलन्स तपासणीसारख्या बिगर आर्थिक व्यवहारांवर कोणतीही मर्यादा नाही. इतर बँकांच्या ATM वर मेट्रो शहरांत ३ तर बिगर मेट्रो शहरांत ५ मोफत व्यवहार (आर्थिक व बिगर आर्थिक मिळून) मिळतील. मोफत मर्यादा संपल्यानंतर प्रत्येक आर्थिक व्यवहारावर २३ रुपये, बिगर आर्थिक व्यवहारावर १० रुपये शुल्क लागेल. खात्यात शिल्लक कमी असल्याने व्यवहार फसल्यास २५ रुपये दंड आकारला जाईल. दिल्ली, मुंबई, कोलकाता, चेन्नई, बेंगळुरू आणि हैदराबाद या शहरांचा मेट्रो शहरांत समावेश आहे. Jio Payments Bank ची नवी सुविधा – जिओ पेमेंट्स बँकेने UPI द्वारे कार्डाशिवाय कॅश काढण्याची नवी सुविधा सुरू केली आहे. या सुविधेअंतर्गत ग्राहक QR कोड स्कॅन करून आणि UPI ॲपद्वारे पुष्टी देऊन पैसे काढू शकतात. यामुळे डेबिट कार्ड किंवा ATM कार्डची गरज राहणार नाही आणि रोख रक्कम काढणे अधिक सोपे होईल. काय काळजी घ्यावी? १ एप्रिलपासून लागू होणाऱ्या या बदलांमुळे वारंवार ATM वापरणाऱ्या ग्राहकांना अतिरिक्त शुल्क भरावे लागू शकते. त्यामुळे आपल्या बँकेची नवी मर्यादा तपासून घ्या, UPI विड्रॉल मोफत मर्यादेत गणली जाणार असल्याने व्यवहारांचे नियोजन करा आणि शक्य तेथे डिजिटल पेमेंटचा वापर करा.