म्यानमारमध्ये पुन्हा एकदा जोरदार भूकंप ; लोक घराबाहेर पळाले, जाणून घ्या परिस्थिती

Myanmar Earthquake । भारताच्या शेजारील देश रविवारी पहाटे म्यानमारमध्ये भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले. या भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर ५.१ इतकी मोजण्यात आली आहे. याठिकणी नुकत्याच झालेल्या भूकंपामुळे संपूर्ण देशात प्रचंड विनाश झाला, ज्यामध्ये तीन हजारांहून अधिक लोक मृत्युमुखी पडले.
नॅशनल सेंटर फॉर सिस्मोलॉजीनुसार, आज सकाळी ०७ वाजून ५४ मिनिटांनी म्यानमारमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले. भूकंपाच्या धक्क्यांची तीव्रता रिश्टर स्केलवर ५.१ इतकी होती. या भूकंपाचे केंद्र जमिनीच्या आत १० किलोमीटर खोलीवर होते. सध्या या भूकंपामुळे कोणत्याही प्रकारची जीवित किंवा वित्तहानी झाल्याचे वृत्त नाही.
२८ मार्च रोजी म्यानमारमध्ये भूकंपाने कहर Myanmar Earthquake ।
२८ मार्च २०२५ रोजी म्यानमारमध्ये एक भयानक भूकंप झाला. मंडाले प्रदेशात झालेल्या या भूकंपाची तीव्रता ७.७ इतकी होती. या भूकंपामुळे देशात मोठे नुकसान झाले. हा भूकंप म्यानमारच्या इतिहासातील सर्वात विनाशकारी भूकंपांपैकी एक होता. म्यानमार सैन्याच्या म्हणण्यानुसार, या भूकंपात ३६०० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे, तर ५ हजारांहून अधिक लोक जखमी झाले आहेत. याशिवाय शेकडो लोक त्यांच्या कुटुंबांपासून वेगळे झाले.
जगातील अनेक देशांनी मदत पाठवली Myanmar Earthquake ।
या भूकंपामुळे मोबाईल कम्युनिकेशन सिस्टीमचेही गंभीर नुकसान झाले आहे. एका इंग्रजी वृत्तपत्रानुसार, भूकंपामुळे एकूण ६,७३० संपर्क केंद्रांचे नुकसान झाले होते, त्यापैकी सुमारे सहा हजारांची दुरुस्ती करण्यात आली आहे. भारत, चीन आणि अमेरिका सारख्या देशांनी म्यानमारला बचावकार्यासाठी आपले पथक पाठवले, तर संयुक्त राष्ट्र आणि युरोपियन युनियन सारख्या आंतरराष्ट्रीय संस्थांनीही म्यानमारला मदत करण्यासाठी मदत आणि बचाव पथके, वैद्यकीय पथके आणि आवश्यक संसाधने पाठवली.
हेही वाचा
वक्फ कायद्यांतर्गत ‘या’ राज्यात पहिली कारवाई ; संचालकाने स्वतःच बेकायदेशीर मदरसा पाडला





