Hemant Dhome : मेरे युवा साथिंयो! आता सुरूवात झालीय… आता मागे हटायचं नाही! प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर हेमंत ढोमेंची पोस्ट
Hemant Dhome : अखेर केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यानंतर आंदोलकांनी या लढ्याला मोठे यश मिळाल्याची भावना व्यक्त केली.

Hemant Dhome : नीट पेपरफुटी प्रकरण उघडकीस आल्यानंतर देशभरात विद्यार्थ्यांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली होती. लाखो विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी संबंधित या प्रकरणामुळे विविध विद्यार्थी संघटना, सामाजिक कार्यकर्ते आणि राजकीय पक्षांनी आंदोलनाचा मार्ग स्वीकारला. याच पार्श्वभूमीवर CJP (कॉकरोज जनता पार्टी) यांनी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी देशभर आंदोलन छेडले. (Hemant Dhome)
दिल्लीतील जंतर-मंतरसह मुंबई आणि इतर अनेक शहरांमध्ये मोठ्या प्रमाणावर आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात हजारो तरुणांनी सहभाग नोंदवला. जंतर-मंतरवरील आंदोलनाला विशेष महत्त्व प्राप्त झाले होते. सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांनी तेथे उपोषण सुरू केले होते. त्यांच्या उपोषणाला देशभरातून पाठिंबा मिळाला. CJP आणि विद्यार्थ्यांनी तब्बल २७ दिवस सातत्याने आंदोलन करत शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी लावून धरली. अखेर केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यानंतर आंदोलकांनी या लढ्याला मोठे यश मिळाल्याची भावना व्यक्त केली. (Hemant Dhome)
या आंदोलनाला विविध क्षेत्रातील मान्यवरांनीही पाठिंबा दर्शवला होता. अनेक कलाकारांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून आपली भूमिका मांडली, तर काही कलाकार प्रत्यक्ष आंदोलनातही सहभागी झाले. मराठी अभिनेता आणि दिग्दर्शक हेमंत ढोमे (Hemant Dhome )याने सुरुवातीपासूनच नीट पेपरफुटी प्रकरण आणि आंदोलनाला पाठिंबा देणाऱ्या अनेक पोस्ट सोशल मीडियावर शेअर केल्या होत्या. (Hemant Dhome)
मेरे युवा साथिंयो!
आता सुरूवात झालीय…
आता मागे हटायचं नाही!
अभिनंदन! 🫡#लोकशाही #राजीनामा @CJP_2029 https://t.co/Wn8wjgJafn— Hemant Dhome । हेमंत ढोमे (@hemantdhome21) July 25, 2026
धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर हेमंत ढोमे यांनी पुन्हा एकदा सोशल मीडियावर प्रतिक्रिया देत लिहिले, “मेरे युवा साथिंयो! आता सुरूवात झालीय… आता मागे हटायचं नाही! अभिनंदन! #लोकशाही #राजीनामा @CJP_2029.” असं म्हटलं आहे. (Hemant Dhome)
हेमंत ढोमेने नीट पेपरफुटी प्रकरण आणि CJPच्या आंदोलनावर सातत्याने भाष्य केले होते. व्हिडिओ आणि सोशल मीडिया पोस्टच्या माध्यमातून त्यांनी आपली भूमिका मांडली. त्यांच्या व्यतिरिक्त ज्येष्ठ अभिनेत्री शबाना आझमी, अभिनेता चिन्मय मांडलेकर यांच्यासह अनेक कलाकारांनी या आंदोलनाला उघडपणे पाठिंबा दिला होता. (Hemant Dhome)
Health Tips: पायऱ्या चढताना तुमचाही श्वास फुलतोय? ‘या’ धोक्याच्या घंटांकडे वेळीच लक्ष द्या!





