Shivani Sonar : माझी तारिणी… अभिनेत्री शिवानी सोनारने दिली चाहत्यांना आनंदाची बातमी; आलिशान कार केली खरेदी, फोटो केले शेअर म्हणाली…

Shivani Sonar : आपल्या सहज सुंदर अभिनयाने मालिकाविश्वात आपल्या नावाचा ठसा उमठवणारी अभिनेत्री शिवानी सोनारीने नुकतीच एक मोठी खरेदी केली आहे. अनेक सेलिब्रिटी त्यांच्या वैयक्तिक आयुष्यातील गोष्टी आपल्या चाहत्यांसोबत सोशल मीडियाच्या माध्यमातून नेहमी शेअर करत असतात. अभिनेत्री शिवानी सोनार हि देखील तिच्या वैयक्तिक आयुष्यातील प्रत्येक गोष्ट तिच्या चाहत्यांना नेहमी शेअर करत असते.
नुकतीच शिवानेने तिच्या आयुष्यातील एक मोठी खरेदी केली आहे. तिने टाटा कंपनीची टाटा अलोट्रोज ही आलिशान कार खरेदी केली आहे. सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत तिने ही आनंदाची बातमी आपल्या चाहत्यांना दिली आहे. कार खरेदी करतानातचा कुटुंबियांसोबतचे सुंदर फोटो तिने यावेळी चाहत्यांसोबत शेअर केले आहे. तिने शेअर केलेल्या फोटोंवर कमेंट करून चाहत्यांनी तिला शुभेच्छा दिल्या आहेत.
View this post on Instagram
शिवानीने सोशल मीडियावर फोटोच्या खाली सुंदर कॅप्शन दिले आहे. ‘माय ओजी तारिणी इज हिअर’ असं कॅप्शनमध्ये म्हटलं आहे. तिने खरदी केलेली टाटा कंपनीची टाटा अट्रोझ या कारची किंमत ६ ते १० लाख आहे. शिवानी सोनार ही मराठी चित्रपट आणि टेलिव्हिजन विश्वातील एक लोकप्रिय अभिनेत्री आहे.
शिवानीने मराठी मनोरंजन क्षेत्रात आपली कारकीर्द 2018 मध्ये ‘द अग्ली डस्क’ या चित्रपटापासून सुरू केली. 2019 मध्ये ‘गर्लफ्रेंड’ या मराठी चित्रपटात शिवानीला खरी ओळख मिळाली. त्यानंतर तिने अनेक चित्रपटांमध्ये आणि मालिकांमध्ये काम केले. सध्या शिवानी झी मराठी वाहिनीवरील “तारिणी” या मालिकेत मुख्य भूमिकेत काम करत आहे.





