दिवाळीच्या मुहूर्तावर नागिन फेम अभिनेत्रीची कार खरेदी! इंन्स्टाग्रामवर खास फोटो केले शेअर

Actress Nia Sharma : भारतीय सणांमध्ये अत्यंत महत्वाच्या समजल्या जाणाऱ्या दिवाळी सणाला सुरूवात झाली आहे. दिवाळी सणाच्या निमित्ताने नव्या वस्तू खरेदी करण्याकडे अनेकांचा कल असतो. अनेकजण आपल्या आवडीच्या वस्तू दिवाळीच्या शुभमुहूर्तावर खरेदी करतात.
कलाविश्वातील कलाकर मंडळींसाठी दिवाळी सण अत्यंत महत्वाचा असतो. या निमित्ताने सेलिब्रिटी नव्या वस्तू खरेदी करत आहेत. नागीन फेम अभिनेत्रीने देखील मोठी खरेदी केली असून तिने महागड्या मर्सिडीची कंपनीचे तिला आवडलेले व्हिरियंट खरेदी केले आहे.
View this post on Instagram
अभिनेत्रीने कार खरेदी केल्यानंतर सोशल मीडियावरून फोटो शेअर करत याबाबतची माहिती दिली. अभिनेत्री निया शर्माने एक चमकदार पिवळ्या रंगाची मर्सिडिज कार खरेदी केली आहे. तिने कार खरेदी करतानाचे खास फोटो आणि व्हिडीओ इंन्स्टाग्रामवरून शेअर केले आहेत.
तिने नवीन कार घरी आल्यानंतर मोठ्या उत्साहात स्वागत केले. तसेच नवीन कार खरेदी केल्यानंतर अभिनेत्री निया शर्माने आपल्या भावना इंन्स्टाग्रामवर पोस्टमधून व्यक्त केल्या. ओएमजी, सर्व पैसे संपले आहेत, ईएमआय चालू झाला. नविन अनुभव आणि बालपणीच्या आठवणींसाठी धन्यवाद.” असे अभिनेत्रीने पोस्टमध्ये म्हटले आहे.
सोशल मीडियावरून तिला चाहत्यांकडून शुभेच्छा दिल्या जात आहेत. अभिनेत्रीने खरेदी केलेली मर्सिडीज कंपनीची मर्सिडीज-एएमजी सीएलई ५३ खरेदी केली. या कारचा रंग पिवळा असून किंमत तब्बल 1.28 कोटी रुपये आहे. अभिनेत्री निया शर्माबद्दल बोलायचे झाल्यास तिने प्रसिद्ध निर्माती एकता कपूरच्या “नागिन” मध्ये नकारात्मक भूमिका केली होती. यामुळे तिला मोठी प्रसिद्ध मिळाली होती.
हेही वाचा : “96 लाख खोटे मतदार घुसवले, निवडणुका घेऊनच दाखवा…”; राज ठाकरेंचा थेट इशारा





