मोठी बातमी..! राज्यसभेवरुन ठाकरेसेनेत मतभेद? शरद पवारांची जागा आदित्य ठाकरेंना हवी?
Rajya Sabha Election : महाराष्ट्र राज्यसभेच्या निवडणुकीवरून महाविकास आघाडीत मोठा पेच निर्माण झाला आहे. शरद पवारांना पाठिंबा देणाऱ्या संजय राऊतांच्या भूमिकेला आदित्य ठाकरेंनी

Rajya Sabha Election : महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला (MVA) मोठा धक्का बसल्यानंतर आता राज्यसभेच्या निवडणुकीतही आघाडीतील घटकपक्षांमध्ये मतभेद समोर आले आहेत. महाराष्ट्रातून एकूण ७ राज्यसभा जागा रिक्त होत असून, सध्याच्या संख्याबळानुसार महाविकास आघाडीकडे फक्त एकच जागा निवडून आणण्याची शक्यता आहे.
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) चे खासदार संजय राऊत यांनी शरद पवार यांना पुन्हा राज्यसभेवर पाठवण्यासाठी आग्रही भूमिका घेतली आहे. राऊत यांनी वारंवार सांगितले की, पवार यांची इच्छा असल्यास त्यांच्यासाठी ही जागा सोडली जावी.
मात्र, शिवसेनेचे आमदार आदित्य ठाकरे यांनी याला विरोध करत ही जागा शिवसेना उबाठा ची असल्याचा दावा ठोकला आहे. आदित्य ठाकरे यांनी स्पष्ट केले की, संख्याबळानुसार ही जागा त्यांच्या पक्षाची आहे आणि चर्चा त्या दिशेने होईल.
याशिवाय, प्रियंका चतुर्वेदी यांचाही राज्यसभा कार्यकाळ संपत असल्याने काही चर्चांमध्ये त्यांना पुन्हा संधी देण्याची मागणी होत आहे. आदित्य ठाकरे यांनी प्रियंका चतुर्वेदी यांच्या नावाची चर्चा केल्याने ठाकरे गटातून पवार यांच्या ऐवजी चतुर्वेदींना प्राधान्य देण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यामुळे ठाकरे गटातच मतभेद तीव्र होण्याची चिन्हे आहेत.
सध्या महाराष्ट्र विधानसभेचे संख्याबळ
भाजप: १३१
शिंदे सेना: ५७
अजित पवार गट (राष्ट्रवादी): ४०
महायुतीकडे एकूण मजबूत बहुमत असल्याने ६ जागा त्यांना मिळण्याची शक्यता.
महाविकास आघाडी: ठाकरे सेना २० + काँग्रेस १६ + शरद पवार गट १० = एकूण ४६ (फक्त १ जागा शक्य)
शरद पवार यांनी अद्याप स्पष्ट भूमिका घेतलेली नाही, पण राऊत यांच्या म्हणण्यानुसार पवार इच्छुक आहेत. मात्र, आघाडीतील ही रस्सीखेच पवार पुन्हा राज्यसभेवर जातील का, याची उत्सुकता आहे. अंतिम निर्णय आघाडीतील चर्चेनंतरच होईल, पण ठाकरे गटातील मतभेद चव्हाट्यावर आले आहेत.




